AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trump: इज्जतच काढली! ट्रम्प यांनी पुतिन यांना अलास्काला बोलावलं, या गोष्टीसाठी तरसवलं, अखेर वैतागून रशियन राष्ट्राध्यक्षांनी खिशातून…

Trump Putin Meeting: अलास्काच्या बैठकीसाठी आलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना आपल्या टीमसह २ कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊन जावे लागले. यामागचे कारणही खूपच रंजक होते. चला जाणून घेऊया नेमकं काय?

Trump: इज्जतच काढली! ट्रम्प यांनी पुतिन यांना अलास्काला बोलावलं, या गोष्टीसाठी तरसवलं, अखेर वैतागून रशियन राष्ट्राध्यक्षांनी खिशातून...
Trump and PutinImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 21, 2025 | 1:45 PM
Share

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीची जगभरात चर्चा झाली. अलास्कामध्ये या दोन बड्या नेत्यांची भेट झाली होती. एका करारासाठी ही भेट असल्याचे म्हटले जात आहे. पुतिन यांच्या या दौऱ्यात अनेक गोष्टी खास होत्या. त्यापैकी एक रंजक गोष्ट अशी होती की, त्यांना अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांच्या विमानांनमध्ये इंधन भरणे गरजेचे होते. मात्र, येथेही त्यांना अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करावा लागला आहे. नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया…

१५ ऑगस्ट ही तारीख ऐतिहासिक होती, जेव्हा जवळपास चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात कोणत्याही करारासाठी व्लादिमीर पुतिन अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले आणि खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. तसेच, रशियावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे त्यांची टीम रशियन जेट विमानांचे इंधन भरण्यासाठी अमेरिकन बँकिंग प्रणालीचा वापर करू शकली नाही.

वाचा: 5 बायका, 12 लफडी… तरीही एकाकी होऊन मेला हा बॉलिवूडचा महाखतरनाक व्हिलन, मृतदेहही सडला…

२५०,००० रोखल डॉलर देऊन भरले इंधन

या गोष्टीची माहिती अमेरिकन परराष्ट्रमंत्री रुबियो यांनी NBC ला दिलेल्या मुलाखतीत दिली. ते म्हणाले, ‘जेव्हा रशियनांचे विमान अलास्कात उतरले, तेव्हा त्यांना इंधन भरण्यासाठी रोख रक्कम द्यावी लागली. ते आमच्या बँकिंग सिस्टमचा वापर करू शकत नाहीत.’ पुतिन यांच्या टीमने एकूण २५०,००० डॉलर म्हणजेच भारतीय चलनात २.२ कोटी रुपये किमतीचे इंधन भरले होते. पुतिन यांची टीम अलास्कात ५ तास थांबली होती. यासाठी ते रोख रक्कम घेऊन आले होते. मार्को रुबियो यांनी रशियावर लादलेल्या निर्बंध आणि त्याच्या परिणामांच्या संदर्भात हीबाब असल्याचे सांगितले जाते. ते म्हणाले की, रशियावर लादलेला प्रत्येक निर्बंध आजही प्रभावी आहे आणि त्याचा परिणाम रशियाला सहन करावा लागत आहे.

रशियाच्या धोरणांमध्ये काही बदल झाला का?

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. पण वेगळी गोष्ट अशी आहे की, रशियावर याचा काही विशेष परिणाम दिसत नाही, म्हणूनच अमेरिका हे निर्बंध त्या देशांवरही लादत आहे जे रशियाशी व्यापार करत आहेत. अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनीही कबूल केले की, या निर्बंधांनंतरही रशियाच्या धोरणांमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. यामुळेच अमेरिकन सरकार रशियावर आणखी निर्बंध लादत नाही, कारण याचा कोणताही तात्काळ परिणाम दिसत नाही.

रशिया-युक्रेन युद्धात पुढे काय?

अलास्कात झालेल्या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर वॉशिंग्टनमध्ये एक बहुपक्षीय बैठकही झाली होती, ज्यात युरोपीय नेते आणि स्वतः जेलेंस्की यांचा समावेश होता. चर्चेत युक्रेनच्या दीर्घकालीन सुरक्षेच्या हमीवर चर्चा झाली. जेलेंस्की यांनी सांगितले की, ते पुतिन यांच्याशी थेट चर्चेसाठी तयार आहेत. ट्रम्प-जेलेंस्की आणि पुतिन यांच्या भेटीसाठी सध्या ठिकाण आणि तारीख निश्चित केली जात आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.