राणी एलिझाबेथच्या पर्समध्ये काय असायचं? पैसे की आणखी काही?

राजमुकूट डोक्यावर होता, वावरताना राजेशाही थाट होता, पण तीसुद्धा एक स्त्रीच होती. तिच्याविषयीच्या अनेक गोष्टी आता पुस्तकांतून, लेखांमधून उघड होऊ लागल्यात.

राणी एलिझाबेथच्या पर्समध्ये काय असायचं? पैसे की आणखी काही?
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावरील अंत्यसंस्काराचे कार्यक्रम हे 10 दिवस सुरु राहणार आहेत.Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 11:03 AM

ब्रिटनची महाराणी कशी होती हे फक्त छायाचित्र आणि व्हिडिओंतून आपण पाहिलेलं आहे. पण तिच्या आजूबाजूला काय असायचं, ती कोणत्या गोष्टी वापरत होती, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते.  इतक्या बारीक गोष्टी कुणीही माध्यमांपर्यंत पोहोचू दिल्या नव्हत्या. ब्रिटनची (Britain) महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांचं नुकतंच निधन झालंय. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर या राणीविषयीच्या अनेक रंजक बाबी उघड होत आहेत. राजमुकूट डोक्यावर असला तरी ती एक महिलाच होती. एक स्त्री (Woman) म्हणून तिचं आयुष्य कसं होतं, याविषयीचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. त्यात काही डिटेल्स माहितीपूर्ण आहेत.

गेल्या काही वर्षांपासूनच महाराणींनी स्वतःच्या अनेक खासगी गोष्टी मोकळेपणाने सांगायला सुरुवात केली होती. त्यात अनेक गोष्टी उघड झाल्यात.

महाराणीने शाही लेखिकेजवळ आपल्या लाइफ स्टाइलविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. महाराणीच्या बॅगमध्ये लिपस्टिक आणि एक लहानसा आरसा असायचा.

महाराणीच्या पर्समध्ये पैसे असायचे का, हा प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे, हो. त्यांच्या पर्समध्ये 5 किंवा 10 पाऊडांच्या नोटांची गड्डी नेहमीच सोबत असायची.

शाही लेखिका सॅली बेडल स्मिथ यांनी ‘एलिजाबेथ द क्वीनः द वुमन बिहाइंड द थ्रोन’ हे पुस्तक लिहिलंय. यात महाराणीविषयी अनेक रंजक गोष्टी नमूद आहेत.

द लेडी या नियतकालिकाला लेखिकेने मुलाखत दिली. त्यात तिने म्हटलंय, महाराणीच्या पर्समध्ये आरसा, पेन तर असायचा. पण त्यासोबतच रविवारी चर्चमध्ये दान करण्यासाठीच्या वस्तूदेखील असायच्या.

डेली मेल वृत्तपत्रातील एका रिपोर्टनुसार, महाराणीच्या पर्समध्ये एक पोर्टेबल हुक असायचे. ते लावले की बॅग कुठेही लटकवून ठेवता येत होती.

महाराणीच्या निधनानंतर ब्रिटनमधील अनेक शाही प्रतीकांमध्ये बदल होऊ शकतो. त्यांचा झेंडा, नोटा, नाण्यांवर महाराणीची प्रतिमा असायची. आता ते हटवून नवे राजे प्रिंस चार्ल्स यांचा फोटो लावण्याची शक्यता आहे.

गुरुवारी 96 वर्षांच्या महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचं निधन झालं. त्या सर्वाधिक काळ म्हणजे 70 वर्षे ब्रिटनच्या महाराणी राहिल्या.

महाराणी एलिजाबेथ द्वितीय हिचे नाणे ब्रिटनचे पाऊंड शिवाय इतर 10 देशांमध्ये चालते. कॅनडात अनेक नोटांवर अजूनही महाराणीचा फोटो आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजियनसहित इतर देशांमध्ये काही नोटांवर महाराणीचा फोटो वापरला जात होता.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.