Sri Lanka crisis : लंका पेटली आंदोलक रस्त्यावर; रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती

रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्या नावाची श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषणा करण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे हे आता श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

Sri Lanka crisis : लंका पेटली आंदोलक रस्त्यावर; रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 12:45 PM

कोलंबो:  श्रीलंका (Sri Lanka crisis) सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र त्याचसोबत आता देशात राजकीय संकट देखील निर्माण झाले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotbaya Rajapaksa) यांनी राजीनामा देण्यापूर्वीच श्रीलंकेतून पलायन केले. ते आपली पत्नी आणि दोन सुरक्षारक्षकांसह मालदीवमध्ये गेले आहेत. मालदीवमध्ये त्यांचे स्वागत तेथील लोकसभेच्या अध्यक्षांनी केले. दरम्यान या वृत्ताने श्रीलंकेत मात्र खळबळ माजली आहे. आंदोलक आता अधिक आक्रमक झाले आहेत. आंदोलक रस्त्यावर उतरले असून, तोडफोड सुरू आहे. रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांच्या नावाची श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषणा करण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे हे आता श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.  ते या सर्वांमधून कसा मार्ग काढणार हे पहावे लागणार आहे. आंदोलकांनी निवासस्थानावर केलेल्या हल्ल्यानंतर विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

गोटबाया राजपक्षे यांचे पलायन

श्रीलंकेमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. नागरिकांचा संयम सुटला असून, आता ते रस्त्यावर उतरे आहेत. नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अकेर शनिवारी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. आंदोलक राष्ट्रपती भवनावर धडकल्यानंतर गोटबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पळ काढला होता. त्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांचे निवासस्थान जाळले. निवासस्थानाला आग लावण्यात आल्यानंतर . रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. तर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आज आपल्या पदाचा राजीनामा देणार होते. मात्र राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबासह देश सोडला आहे. ते मालदीवच्या आश्रयाला गेले आहेत.

हे सुद्धा वाचा

आंदोलकांनी घेतला राष्ट्रपती भवनाचा ताबा

श्रीलंकेत परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या आठड्यात शुक्रवारी श्रीलंकेत अनिश्चत कालवधीसाठी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. सैन्यादल रस्त्यावर उतरले होते. सर्व महत्त्वांच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र तरी देखील आंदोलकांनी बंदोबस्ताला न जुमानता राष्ट्रपती भवनाला घेराव घातलाय. राष्ट्रपती भवनात आंदोलक दाखल होताच राष्ट्रपती राजपक्षे हे राष्ट्रपती भवनातून निघून गेले. तेव्हापासून आंदोलकांनी राष्ट्रपती भवन आपल्या ताब्यात घेतले आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.