रानील विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवे पंतप्रधान, संध्याकाळी होणार शपथविधी, स्थिरता येणार ?

रानील विक्रमसिंघे होणार श्रीलंकेचे नवे पंतप्रधान, संध्याकाळी होणार शपथविधी, स्थिरता येणार ?
Sri lanka new Pm
Image Credit source: social media

रानिल विक्रमसिंघे हे 1994 पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. आत्तापर्यंत ४ वेळा त्यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळलेली आहे. ७३ वर्षीय रानिल यांनी वकिलीची सनदही मिळवलेली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

May 12, 2022 | 3:52 PM

कोलंबोयुनायडेट नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe)हे अस्वस्थ असलेल्या श्रीलंकेचे (Sri lanka) नवे पंतप्रधान (Prime minister)होणार आहेत. आर्थिक आणि राजकीय संकटात आणि हिंसाचारग्रस्त श्रीलंकेला विक्रमसिंघेच्या रुपात नवे नेतृत्व मिळतेय. आज संध्याकाळी साडे सहा वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या पक्षाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी यापूर्वीही श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळलेली आहे. २०१९ साली पक्षाच्या दबावामुळे त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.

कोण आहेत रानिल विक्रमसिंघे

रानिल विक्रमसिंघे हे 1994 पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. आत्तापर्यंत ४ वेळा त्यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळलेली आहे. ७३ वर्षीय रानिल यांनी वकिलीची सनदही मिळवलेली आहे. ७० च्या दशकात रानिल यांनी राजकारणात प्रवेश केला आणि १९७७ साली ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९९३ साली पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या रानील यांनी त्यापूर्वी उपपरराष्ट्रमंत्री, युवक आणि रोजगार मंत्री यासह इतरही खात्यांचा पदभार सांभाळलेला होता. संसदेत दोन वेळा विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेतही ते होते.

अस्थिरता आणि असंतोष रोखण्याचे आव्हान

श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे तिथे गेल्या काही काळापासून असंतोष आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्याने नागरिक संतप्त आहेत. श्रीलंकन नागरिक मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात आंदोलने आणि निदर्शने करीत आहेत. विरोधकांच्या दबवामुळे आधीचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालाय. राजपक्षे यांचे घर, माजी मंत्र्यांचे घरही जाळण्यात आले आहे. तर एका खासदाराचाही या हिंसाचारात मृत्यू झालाय. या सगळ्यात बुधवारी श्रईलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देशाला संबोधित केले आणि एका आठवड्याच्या आत देशाला नवे सरकार मिळेल अशी घोषणा केलीय. पंतप्रधान आणि मत्र्यांची नियुक्ती करण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले आहे. नागरिकांनी संयम बाळगावा, कटुता पसरवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

श्रीलंकन सेंट्रल बँक गव्हर्नर पद सोडणार ?

श्रीलंका सेट्रल बँकेचे गव्हर्नर पी नंदलाल वीरसिंघे यांनी येत्या दोन आठवड्यात देशात राजकीय स्थिरता आली नाही, तर पद सोडण्याची भूमिका जाहीर केली होती. सद्यस्थितीत जोपर्यंत देशात राजकीय संकटाचे उत्तर निघत नाही, तोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील.

 

ट्रेड युनियने संप मागे घेतला

श्रीलंकेतील ट्रेड युनियन्सनी बुधवारी सरकारविरोधात पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. देशातील हिंसक घटना सुरु असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत देशात स्थिरता येणे गरजेचे आहे, त्यासाठी मदत करणे ही आपली जबाबदारी असल्याचे या युनियन्सनी जाहीर केले आहे. काहीजण या संकटाचा फायदा घएू इच्छितात, त्यांना मदत करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें