
तुम्ही कितीही शक्तीशाली बना, तुमच्याकडे अत्याधुनिक सोयी-सुविधा, एकाहून एक सरस उपकरणं, अत्याधुनिक शस्त्रास्त्र असली, तरी निर्सगासमोर कोणाचच काही चालत नाही. निर्सग हाच सर्व शक्तीमान आहे. सध्या सुपरपॉवर अमेरिका याचा अनुभव घेत आहे. अमेरिका आज पृथ्वीवरचा सर्वात प्रगत देश आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधा, यंत्रणांनी सज्ज असलेला हा देश. पण मागच्या सहा दिवसांपासून जंगलात पेटलेल्या वणव्यासमोर हा देश हतबल आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील एक सुंदर राज्य या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. कॅलिफोर्नियात बराचसा भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात पेटलेला वणवा लॉस एंजेलिस शहरापर्यंत पोहोचला. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात भीषण वणवा आहे. जवळपास 40 किलोमीटरच्या क्षेत्रात ही आग पसरलेली आहे. यात 12 हजारपेक्षा जास्त इमारती जळून खाक झाल्या आहेत. लॉस एंजेलिस हे हॉलिवूड स्टार्ससाठी ओळखलं जातं. अनेक सुपरस्टार अभिनेते, अभिनेत्रींची आलिशान घरं या आगीत जळून खाक झाली आहेत. कॅलिफोर्नियात लॉस एंजेलिस शहर आहे. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने लॉस एंजेलिसच्या आगीला अजून भीषण बनवलं आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत होरपळून कमीत कमी...