जगात मृत्यूचं भयानक तांडव! युद्ध पुन्हा पेटलं, 27 जण ठार; 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त

रशियाने युक्रेनवर हल्ला केला. रशियाने लोक वस्तीत केलेल्या हल्ल्यात जवळपास 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

जगात मृत्यूचं भयानक तांडव! युद्ध पुन्हा पेटलं, 27 जण ठार; 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त
russia attack
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 6:16 PM

रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडली आहे. रशिया आणि युक्रेनने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये शनिवारी झालेल्या भीषण हल्ल्यात कमीत कमी 27 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या एअर स्ट्राइकने 50 हून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात आगीचे लोट पसरले. आगीत शहरातील रेस्टारंट , हॉटेल जळून खाक झाले आहेत.

रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर लागलेल्या आगीनंतर 380 हून अधिक जणांना रेस्क्यू करण्यात आलं. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रहिवासी वस्तीत दारूगोळा साठवण्याबाबतच्या प्रशासकीय निष्काळजीपणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सैन्य दलाच्या प्रशासनाचे प्रमुख टिमूर टकाचेंको यांनी सांगितलं की, लोक वस्तीत झालेल्या हल्ल्यात जवळपास 50 हून अधिक इमारतींचं नुकसान झालं आहे. आगीमुळे घरांचं मोठं नुकसान झालं आहे. युक्रेन आणि रशियामध्ये मागील साडे चार वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबलेलं नाही. वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनची राजधानीमधील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Loading...

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं की, बुचामधील मायला गावातील एका गोदामावर हल्ला झाला. या भीषण हल्ल्याने संपूर्ण शहर हादरलं. हल्ल्याचा फटका गावातील वृद्ध आणि दिव्यांगाच्या आश्रमालाही बसला. नियमानुसार, लोक वस्तीच्या ठिकाणी दारूगोळा साठवण्यास बंदी आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा देखील दिसून येत आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती झेलेन्स्की यांनी दिली.

युक्रेनचे पंतप्रधान सेरगी कोरेत्की यांनी घटनेचा निषेध नोंदवला आहे. सलग पाचव्या वर्षीही रशियाकडून हल्ले होत आहे. पाचव्या वर्षीही गंभीर चुका घडत आहेत. वारंवार होणाऱ्या एकच चुकीमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान सेरगी कोरेत्की यांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर दोषींवर काय कारवाई केली जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर आता युक्रेन प्रतिहल्ला करणार का, याकडे युक्रेनमधील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us