
रशियाला भूकंपाच्या तीव्र झटक्याने या देशाला मोठे हादरे बसले. कामचटका या द्वीपसमूहाजवळ शनिवारी 7.1 तीव्रतेचा भूकंप आला. USGS ने त्याची तीव्रता 7.4 इतकी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्सुनामीचा धोका वाढला आहे. अमेरिका आणि चीन या देशांनी या भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जपानसह पूर्व आशियातील काही देशांना त्सुनामीचा सातत्याने इशारा देण्यात येत आहे. काही भविष्यवाण्यांनी या देशातील नागरिकांच्या काळजीत भर घातली आहे. त्यात या परिसरात सातत्याने भूकंपाचे हादर बसत असल्याने नागरिक काळजीत सापडले आहेत.
पृथ्वीच्या पोटात भूकंपाचे केंद्र
अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा 7.4 तीव्रतेचा भूंकप आहे. त्याचा केंद्रबिंदू 39.5 किलोमीटर खोल असल्याचे समोर आले आहे. आकड्यातील तफावत पाहता याप्रकरणी रशियासह इतर संस्थांनी हा महाशक्तीशाली भूकंप असल्याचे मानल्या जात आहे. भूकंपानंतर पॅसिफिक त्सुनामी वार्गिंग सिस्टिमने लागलीच त्सुनामीचा इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्यापासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी सुद्धा या परिसरात 7 .1 तीव्रतेचा भूंकप आला होता. सध्या जपानच्या हवामान खात्याने अद्याप या परिसरात कोणत्याही त्सुनामीचा इशारा दिलेला नाही.
रशियातील कामचटका या द्वीप समूहाजवळ 30 जून 2025 रोजी 8.8 तीव्रतेचा महाशक्तीशाली भूकंप आला होता. या भूकंपाने समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या. तर अनेक घरं पडली. झाडं उन्मळून पडली होती. याविषयीच्या व्हिडिओने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. खवळलेल्या समुद्राचे रौद्र रुप पाहून अनेकांची बोबडी वळली होती.
तर त्यापूर्वी जपानमध्ये 3 जून 2025 रोजी 5.5 तीव्रतेचा भूकंप आला होता. 21 जूनपासून टोकारा द्वीप समूहाजवळ 900 भूकंप आले होते. जपान हा प्रशांत महासागरातील देश आहे. या क्षेत्राला भूकंप प्रभावित म्हणून ओळखल्या जाते. हा प्रशांत समुद्रातील रिंग ऑफ फायरवर वसलेला देश म्हणून ओळखल्या जातो. तर जपानची भविष्यवेत्ती रिओ तात्सुकी हिने जुलै महिन्यात जपानला महात्सुनामीचा फटका बसण्याचे भविष्य वर्तवले होते. पण तसे अद्याप काही झालेले नाही. पण 2011 मधील तोहोकू भूंकप आणि काही इतर प्रमुख घटनांची नोंद तिच्या पुस्तकात केली होती. त्या खऱ्या ठरल्या होत्या. त्यामुळे येथील लोक अजूनही भयभयीत आहेत.