रशियात मोठी खळबळ! पुतीन यांच्याविरोधात मोठं बंड? पडद्यामागच्या गोष्टी समोर आल्याने चिंता वाढली

Vladimir Putin : पुतीन यांचे माजी समर्थक इल्या रेमेस्लो यांनी असा दावा केला आहे की, व्लादिमीर पुतीन यांच्या जवळचे लोक गुपचूपपणे त्यांचा विरोध करत आहेत आणि पुढील एका वर्षाच्या आतच रशियामध्ये नेतृत्वात मोठा बदल घडून येऊ शकतो.

रशियात मोठी खळबळ! पुतीन यांच्याविरोधात मोठं बंड? पडद्यामागच्या गोष्टी समोर आल्याने चिंता वाढली
russia political crisis
Image Credit source: Google
| Updated on: Apr 28, 2026 | 4:44 PM

जगात सध्या तणावाचे वातावरण आहे. रशिया युक्रेनसोबतच्या युद्धात व्यस्त असताना आता राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याबाबत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. पुतीन यांचे माजी समर्थक इल्या रेमेस्लो यांनी म्हटले आहे की, पुतीन यांच्या जवळचे लोकच त्यांचा आतून त्यांना विरोध करत असून पुढील एका वर्षात रशियामध्ये सत्तांतर होऊ शकते. रेमेसलो यांनी ही माहिती पत्रकार क्सेनिया सोबचाक यांना दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. यावेळी त्यांनी रशियातील सध्याच्या समस्यांसाठी थेट पुतीन यांना जबाबदार धरले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

‘द सन’ने याबाबत एक अहवाल सादर केला आहे. यानुसार, रेमेसलो यांनी स्वतःला अशी व्यक्ती म्हणून सादर केले, जी या व्यवस्थेला आतून समजते आणि ती बदलू शकते. त्यांनी सिस्टीममध्ये काम करणाऱ्या लोकांना आवाहन केले की त्यांनी घाबरू नये आणि योग्य वेळी बदलाला साथ द्यावी. रेमेसलो यांच्या मते, 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीपर्यंत रशियात मोठा बदल होऊ शकतो. हा बदल हिंसक नसेल, तर शांततेच्या मार्गाने होईल असंही रेमेसलो यांनी म्हटलं आहे.

पुतीन यांचा उत्तराधिकारी कोण?

इल्या रेमेसलो यांनी म्हटले की, रशियातील अनेक मोठे नेते पुतीन यांच्यावर नाराज आहेत, कारण त्यांना आता पूर्वीसारख्या सुविधा आणि ताकद मिळत नाही. रेमेसलो यांनी पुतीन यांचा उत्तराधिकारी कोण याबाबतही भाष्य केले आहे. पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन, अर्थमंत्री मॅक्सिम रेशेतनिकोव्ह आणि पुतिन यांचे माजी बॉडीगार्ड अलेक्सी ड्यूमिन हे पुतीन यांचे उत्तराधिकारी असतील असं इल्या रेमेसलो यांनी म्हटले आहे. दरम्यान, रेमेसलो हे पूर्वी पुतीन समर्थक होते, मात्र मार्च महिन्यात त्यांनी पुतिन यांना युद्धगुन्हेगार आणि खोटारडे असा आरोप केला होता.

रशियन अर्थव्यवस्थेवर दबाव

गेल्या काही काळापासून रशियाची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आहे. गेल्या दोन वर्षांत खाद्यपदार्थांच्या किमती सुमारे 18.6% ने वाढल्या आहेत. कर वाढल्यामुळे लहान व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे, तर मोठ्या कंपन्यांनाही सरकारी नियंत्रणाची भीती वाटत आहे. यासोबतच इंटरनेट आणि फोन नेटवर्कवरही निर्बंध वाढवण्यात आले आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी संचार सेवा बंद करावी लागली आहे. दरम्यान, युक्रेन युद्धात सुमारे 12 लाख रशियन सैनिक ठार, जखमी किंवा बेपत्ता झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Follow Us