Sanjay Nirupam | उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून तिसऱ्या उमेदवाराचे संकेत
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार का?, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या मुद्द्यावर भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी, “उद्धव ठाकरे हे इतके मोठे नेते नाहीत,” असे वक्तव्य केले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार का?, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या मुद्द्यावर भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी, “उद्धव ठाकरे हे इतके मोठे नेते नाहीत,” असे वक्तव्य केले. तसेच, शरद पवार यांच्या नेतृत्वाशी तुलना करत निरुपम म्हणाले की, “शरद पवार हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. ते निवडणुकीत उतरले, तर त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करू नये.” मात्र, ठाकरे यांच्या बाबतीत अशी भूमिका घेण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, विधान परिषद निवडणुकीत शिवसेना तिसरा उमेदवार देण्याची शक्यता देखील निरुपम यांनी व्यक्त केली. “फक्त उद्धव ठाकरे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जागा कमी करून निवडणूक लढवली जाईल, असे नाही,” असेही त्यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 28, 2026 03:27 PM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर

