AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाने उत्तर कोरियासाठी पाठवले ब्राह्मोस पेक्षा वेगाने जाणारे क्षेपणास्त्र, पुतिन यांच्याकडून अमेरिकेला धक्का

रशियाने संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिबंध असतानाही उत्तर कोरियाला सैन्य मदत केली आहे. रशियाने आपले एअर डिफेन्स सिस्टम, इलेक्ट्रॉनिक जॅमर आणि इतर सैनिक मदत उत्तर कोरियाला दिली आहे. एका आंतरराष्ट्रीय रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे.

रशियाने उत्तर कोरियासाठी पाठवले ब्राह्मोस पेक्षा वेगाने जाणारे क्षेपणास्त्र, पुतिन यांच्याकडून अमेरिकेला धक्का
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 30, 2025 | 2:33 PM
Share

रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या लष्करी नात्यासंदर्भात एक रिपोर्ट समोर आला आहे. रशियाने उत्तर कोरियाला आपले एअर डिफेन्स सिस्टम, इलेक्ट्रॉनिक जॅमर आणि इतर सैनिक मदत दिली आहे. एका आंतरराष्ट्रीय रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाकडून उत्तर कोरियावर प्रतिबंध असताना हे सर्व होत आहे. एका प्रकारे व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेला धक्का दिला आहे.

उत्तर कोरियाला रशियाने सैन्य मदत दिल्याबद्दल बहुपक्षीय देखरेख समूहाने (Multilateral Sanctions Monitoring Team) दिलेल्या अहवालात दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की, नोव्हेंबर 2024 पासून किंवा त्यापूर्वी रशिया उत्तर कोरियाला सैन्य मदत देत आहे. उत्तर कोरियाला रशियाने पॅटीर मोबाइल संरक्षण प्रणाली, लढाऊ विमाने दिली आहे. ही प्रणाली जमिनीवर हवेत मार करण्यासाठी ओळखली जाते. शत्रूचे विमान अवकाशात नष्ट करण्याची क्षमता या प्रणालीत आहे.

पॅटीर डिफेन्स सिस्टमच्या क्षेपणास्त्राची स्पीड ब्राह्मोसपेक्षाही जास्त आहे. परंतु ब्रह्मोस आणि त्याची तुलना करता येणार नाही. कारण पॅटीर एक शॉर्ट रेंज एअर डिफेन्स प्रणाली आहे. दुसरीकडे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. रेंजमध्ये ब्राह्मोस खूप पुढे आहे. ब्राह्मोस 650 किमीपर्यंत हल्ला करु शकतो. परंतु पॅटीरची 1.2 ते 20 किमीची रेंज आहे. या टप्प्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राने त्याचा मारा होऊ शकतो. परंतु वेगाचा विचार केल्यास पॅटीर ब्राह्मोसपेक्षा पुढे आहे. याचा वेग 3.2 मॅक असू शकतो. ब्राह्मोसचा वेग 3 मॅक आहे.

एमएसएमटी समूह अमेरिका आणि दक्षिण कोरियाने मिळून मागील वर्षी तयार केला होता. त्यावेळी रशियाच्या व्हिटोमुळे संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष पॅनल बरखास्त करण्यात आले होते. आता या पॅनलमध्ये 11 देश आहेत. त्यात फ्रॉन्स, ब्रिटेन, जपान आणि जर्मनीसारखे मोठे देशही आहेत. रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, सप्टेंबर 2023 मध्ये उत्तर कोरियाला रशियाने मोठ्या प्रमाणात शस्त्रे पाठवली. त्यात आर्टिलरी राउंड्स, शेकडो क्षेपणास्त्रे, तोफा, एंटी टँक गाईड यांचा समावेश आहे. तीन बटालियन शस्त्रसज्ज होऊ शकते, इतका हा शस्त्रसाठा आहे.

Follow Us
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत