
रशिया आणि यूक्रेन यांचे युद्ध जवळपासून दोन – अडीच वर्षे सुरुच आहे. गुड फ्रायडे निमित्ताने सुरु असलेली सिजफायर संपल्यानंतर रशियाने दोनदा युक्रेनवर हल्ले केले. यावेळी रशियाने रहिवासी विभागात हल्ले केले होते. याचा बदला अखेर युक्रेनने घेतला आहे. युक्रेनने रशियाच्या 4,000 किलोमीटर आत घुसून साहसी ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या या हल्ल्यात रशियाच्या 40 हून अधिक लढाऊ विमानांचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या हल्ल्याने क्रेमलिनमध्ये खळबळ उडाली आहे. रशियाच्या एकूण पाच विमानतळांवर भीषण ड्रोन अॅटॅक झाल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अक्षरश: हडबडले आहेत.
येथे पोस्ट पाहा –
Russia’s RS-28 Sarmat, also called Satan II is a ICBM
The missile officially entered combat service in September 2023, as the world’s longest range extant ICBM system with an operational range of ~18,000 km
If a world war breaks out, Moscow will definitely use this monster in… pic.twitter.com/L7laC3d7ge
— Jack Straw (@JackStr42679640) October 3, 2023
युक्रेनने 40 हून अधिक लढाऊ विमानांचा अक्षरश: कोळसा केल्याने रशियाने एका जबरदस्त हल्ल्याची तयारी केली आहे. या आता ही वेळ पारंपारिक शस्रास्रांपर्यंत ही बाब मर्यादित राहणार नाही.या हल्ल्याला आता रशिया काय प्रत्युत्तर दिले जाते याकडे जगाचे लक्ष लागले असतानाच रशियाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
रशियाकडे हा एकेकाळचा सुपरपॉवर देश आहे. त्याच्याकडे काही असे आण्विक शस्रास्रे आहेत जिच्यामुळे जग अवघ्या काही मिनिटांत नष्ट होऊ शकते. यातील सर्वात खतरनाक क्षेपणास्र “RS-28 सरमत” आहे, त्यास पाश्चात्य जगताने “Satan-2” असे नाव दिले आहे. हे आंतरखंडीय क्षेपणास्र आहे. या बॅलेस्टीक मिसाईलमध्ये 15-16 अणू बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे. याची रेंज 13,000 ते 16,000 किलोमीटर इतकी प्रचंड आहे.
RS-28 Sarmat (Satan-2): हे रशियाचे सर्वात अत्याधुनिक आणि विनाशकारी ICBM आहे. जे आण्विक शस्रास्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्र एकाच वेळी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हाहाकार माजवू शकतात.
Tochka-U: हे मध्यम पल्ल्याचे मिसाईल आहे, जी शत्रूच्या ठिकाणांवर अचूक हल्ले करते.
Iskander-M: हे मध्यम पल्ल्याचे परंतू अत्यंत घातक मिसाईल आहे. ज्याचा वापर महत्वाच्या लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ कमांड सेंटर्स, वगैरे ठिकाणांना याने लक्ष्य केले जाते.
Kalibr: रशियाची समुद्रावरुन डागता येणारी मिसाईल, जी अत्यंत अचूकपणे लक्ष्यभेद करते. यूक्रेन युद्धात या क्षेपणास्राचा अनेकवेळा वापर झाला आहे.
Kh-101: हे लांबपल्ल्याचे एअर-लॉन्च क्रूझ मिसाईल आहे. हे रशियाच्या बॉम्बवर्षाव करणाऱ्या विमानांवरुन सोडले जाते.
रशियाकडे मोठ्या प्रमाणावर रणनीतीक आणि सामरिक आण्विकअस्रं आहेत. ही अण्वस्रं युद्धात निर्णायक भूमिका वठवू शकतात.परंतू याचा प्रयोग जागतिक संतुलनासाठी खूपच संवेदनशील आहे.
Avangard: ध्वनी पेक्षा 20 पट वेगाने उडणारे हे मिसाईल डिफेन्स सिस्टमला चकवा देऊ शकतात.
Kinzhal: ही एक एअर-लॉन्च्ड मिसाईल आहे आणि ती फायटर जेटवरुन डागली जाते आणि टार्गेटवर वेगाने पोहचून त्यास बरबाद करते.
Sukhoi-57 आणि Sukhoi-35: ही रशियाचे एक अत्याधुनिक लढाऊ विमान आहे जे मल्टीरोल्स क्षमतेने परिपूर्ण आहे.
ड्रोन:रशियाजवळ टोही आणि हल्ला करणारे अनेक पद्धतीची आधुनिक ड्रोन्स सिस्टम आहे.
TOS-1A आणि Buratino: ही शस्रास्र हथियार एकाच वेळी अनेक रॉकेट डागण्यास सक्षम आहेत आणि शत्रूचे बंकर आणि लष्करी ठाण्यांना संपूर्णपणे नष्ट करण्याची त्यांची क्षमता आहे.