
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने तिथं वास्तव करीत असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ युक्रेन सोडण्याचं फर्मान दिलं आहे.

रशियाने युक्रेनवरती ताबा मिळवल्यापासून अनेक विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचं काम भारत सरकार करीत आहे

युक्रेनमध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत येताना त्यांच्या हातात मांजर आणि कुत्रा असे प्राणी दिसत आहे

युद्धजन्य परिस्थिती असताना देखील तिथून प्राणी घेऊन आल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे.

युक्रेनवरती हल्ला होत असताना भारतात येण्यासाठी जवळच्या देशात अनेकांनी आपली मांजर नेली, तसेच तिची भारतात येईपर्यंत काळजी घेतली असल्याचं एका विद्यार्थ्यांने सांगितले आहे.

एका विद्यार्थांने कुत्रासोबत आणला आहे, तो तिथं त्याच्यासोबत अनेक दिवसांपासून होता असं तो म्हणाला आहे.

भारतातील साधारण 18,000 नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते, त्यापैकी अनेकांना भारतात आणण्यात यश भारत सरकारला यश आले आहे.

भारतात येणा-या विद्यार्थ्यांचं केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली विमानतळावरती स्वागत केलं आहे. विमानतळावर विद्यार्थ्यांना पाहून पालकांना आनंद झाला आहे.