Russia-Ukraine War : जगातील अजून एक युद्ध थांबणार? ट्रम्प यांचे कौतुक करतानाच रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे पुतिन यांचे ते मोठे संकेत
Vladimir Putin- Donald Trump : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्या एका वक्तव्याने जगातील अजून एक युद्धा थांबण्याची चिन्ह दिसत आहेत. जर पुतिन यांनी मनावर घेतलं तर कदाचित रशिया-युक्रेन पण लवकरच थांबेल, काय म्हणाले पुतीन?

Putin Praise Donald Trump : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी केलेल्या एका वक्तव्याने जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकेच काय तर रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे मोठे संकेत सुद्धा मिळाले आहेत. पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एकीकडे इराण-इस्त्रायल यांचे युद्ध थांबले. इराणमध्ये खामेनी एकाकी पडल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे अमेरिका इराणला मोठी आर्थिक रसद देण्याच्या तयारीत आहे. मध्य-पूर्वेत अमेरिकेला तिचे इप्सित साध्य केल्याचे हे संकेत आहेत. तर या प्रदेशात नाटोचा रशियाला वाटणारा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी महत्त्वाचे पाऊल टाकल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.
ट्रम्प यांच्यावर पुतिन यांच्या कौतुकाचा वर्षाव
मध्य-पूर्वेत शांतता आणण्यात ट्रम्प यांनी महत्त्वाची भूमिका घेतल्याचे कौतुक पुतिन यांनी केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे धाडसी व्यक्ती आहे. ते लढवय्ये आहेत. ते दोनदा हल्ल्यातून बचावले आहे. ट्रम्प हे इमानदार आहेत. ते रशिया-युक्रेन थांबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असल्याचा कौतुकाचा पूल पुतिन यांनी बांधला. अमेरिका ही मध्य-पूर्वेत आणि युक्रेनमध्ये जे प्रयत्न करत आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो असे मोठे वक्तव्य पुतिन यांनी केले आहे.
पुतिन यांचे हे वक्तव्य रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याविषयीच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना बळकटी देणारे मानण्यात येत आहे. युक्रेन आणि रशियात वार्ता घडवून आणण्याचे प्रयत्न यापूर्वी सुद्धा झाले होते. पण दोन्ही देशांनी पुन्हा एकमेकांवर हल्ले चढवले. त्यामुळे शांतता प्रक्रिया बाधित झाली. आता पुतिन यांच्या वक्तव्याने रशिया-युक्रेन युद्ध लवकरच थांबण्याची चिन्ह दिसत आहेत.
ट्रम्प यांच्यासोबत बैठकीस रशिया तयार
ट्रम्प यांच्यासोबत चर्चेसाठी, बैठक करण्यास रशिया तयार असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले. अनेकदा चर्चा करावी, बैठक घ्यावी याविषयी ट्रम्प प्रशासनाने संकेत दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नाच्या परकाष्ठेमुळे अमेरिका आणि रशिया यांचे संबंध दृढ झाले आहेत. आमच्या दोघातील होणारी बैठक ही या संबंधांना नवीन उंचीवर नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने खामेनींच्या देशावर हल्ला केला. त्यावेळी रशियाने या हल्ल्याची निंदा केली होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न हे शांततेसाठी असल्याचा सूर आता रशियाने आळवला आहे. रशिया-युक्रेनमधील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला विराम देण्याची वेळ आल्याचे बहुधा त्यांच्या ही लक्षात आले असावे, त्यामुळे त्यांनी एकप्रकारे युद्ध विरामाचेच संकेत दिले आहेत.
