Russia ukraine war मिसाइल, दारुगोळ्य़ाच्या पलीकडे, जेवण मागवलं नंतर जे घडलं ते भयानक
Russia-ukraine war | रशिया आणि युक्रेन युद्धाला दीड वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. पण अजूनही या युद्धाचा शेवट दृष्टीपथात नाहीय. युक्रेन रशिया बरोबर जिंकू शकणार नाही. पण आता या युद्धामध्ये एक वेगळ वळण आलय. आता या युद्धात जे सुरु आहे, ते खूपच भयानक आहे.
Russia-ukraine war | युक्रेनमध्ये रशियाच्या तीन FSB अधिकाऱ्यांना खतरनाक पद्धतीने संपवण्यात आलं. त्यांच्या जेवणामध्ये आर्सेनिक आणि उंदीर मारण्याच औषध मिसळण्यात आलं होतं. मेलिटोपोलमद्ये भूमिगत राहणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांनी हे काम केलं. कोणाच्या काही लक्षात येईपर्यंत त्यांना जेवण देणारा तिथून फरार झाला होता. रशियन अधिकाऱ्यांनी अजून दुजोरा दिलेला नाही. युक्रेनमध्ये जेवणात विष मिसळून रशियन फेडरल सिक्योरिटी सर्विसच्या तीन अधिकाऱ्यांना संपवण्यात आलं. त्यानंतर रशियन सैन्याकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरु आहे. पण यश मिळालं नाही. द सनच्या रिपोर्ट्नुसार, ज्या रेस्टॉरंटमध्ये भोजन आणि दारु पोहोचवण्यात आली, तिथे शोध मोहिम राबवण्यात आली. विषाचा कुठलाही अंश आढळला नाही.
रशियन फेडरल सिक्योरिटी सर्विसच्या तीन अधिकाऱ्यांना विष देऊन मारल्याची पुष्टी कीव पोस्टने केली आहे. त्याशिवाय मेलिटोपोलचा निर्वासित महापौर इवान फेडोरोवने सुद्धा पृष्टी केलीय. यूक्रेनी टीवी चॅनल यूनाइटेड न्यूजशी बोलताना फेडोरोव म्हणाला की, अधिकाऱ्यांनी स्थानिक कॅफेमधून जेवण ऑर्डर केलं होतं. ते खाल्ल्यानंतर विषामुळे मृत्यू झाला. जो जेवण घेऊन आला, तो सापडत नाहीय, असं मेयरने सांगितलं. युक्रेनवर हल्ला केल्यामुळे नाराज असलेल्यांच हे कृत्य आहे.
विष असलेली दारु आणि केक
शत्रूला संपवण्यासाठी मिसाइल आणि रॉकेटच पुरेसे नाहीयत. सैनिक आपल्या पद्धतीने सुद्धा मिशन करतात असं महापौर म्हणाला. टेलिग्राम चॅनलनुसार, जे तीन FSB चे अधिकारी मारले गेले, त्यातल्या दोघांनी ब्लॅक सी मधील नाविकांच्या दफनाची चौकशी सुरु केली होती. रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरुच आहे. मेलिटोपोल ताबा मिळवणाऱ्या रशियन सैन्यावर विषप्रयोग होऊ शकतो, अशी शक्यता आधी सुद्धा व्यक्त करण्यात आली होती. मागच्या महिन्यात रशियाच्या काही पायलट्सची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. रशियन सैन्य तळावर विष असलेली दारु आणि केक पोहोचवण्यात आले होते. या बद्दल माहिती मिळाल्यानंतर केक आणि दारुला कोणी स्पर्श केला नाही,