Russia Ukraine war : बेलारुसमध्ये चर्चेसाठी यूक्रेनची सहमती, रशियन माध्यमांचा दावा, विध्वंस थांबणार?

सकाळीच बेलारूसमध्ये चर्चेस युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी  (Zelenskyy) नकार दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता तिथे चर्चेसाठी युक्रेनने तयारी दर्शवल्याचा दावा रशियन माध्यामांनी केला आहे.

Russia Ukraine war : बेलारुसमध्ये चर्चेसाठी यूक्रेनची सहमती, रशियन माध्यमांचा दावा, विध्वंस थांबणार?
Image Credit source: twitter
| Updated on: Feb 27, 2022 | 7:19 PM

रशिया-यूक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने (Russia Ukraine War) सध्या संपूर्ण जग दहशतीखाली आहे. युक्रेनमध्ये घडीघडीला बॉम्ब आणि मिसाईल (Missile) डागल्याचे आवाज येत आहेत. यात मोठी जीवितहाणी त्याचबरोबर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आता हे युद्ध निर्णयाक वळणावर असल्याचा दावा केला जाते आहे. रशिया-आणि युक्रेनमध्ये चर्चेचा मार्ग सकारात्मक झाल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला आहे. सकाळीच बेलारूसमध्ये चर्चेस युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी  (Zelenskyy) नकार दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता तिथे चर्चेसाठी युक्रेनने तयारी दर्शवल्याचा दावा रशियन माध्यामांनी केला आहे. त्यामुळे आता तरी हा विध्वंस थांबणार का? असा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. सुरू असलेल्या हल्ल्यासाठी बेलारूस ग्राउंड सपोर्ट करत असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रविवारी एका व्हिडिओ संदेशात वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, इस्तंबूल, बुडापेस्ट किंवा बाकू यांचे चर्चेची पर्यायी जागा म्हणून नाव दिले होते. तसेच ते म्हणाले की चर्चा इतर ठिकाणी देखील होऊ शकते, सुरूवातील बेलारूसमध्ये चर्चेस त्यांनी नकार दिला होता.

ANI वृत्तसंस्थेचे ट्विट

रशिया चर्चेसाठी तयार असल्याचा दावा

क्रेमलिनने रविवारी सांगितले की त्यांचे एक शिष्टमंडळ युक्रेनियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बेलारशियन शहर गोमेल येथे पोहोचले आहे.यात क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की शिष्टमंडळात लष्करी अधिकारी समावेश आहे. ते म्हणाले, “रशियन शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार आहे आणि आम्ही युक्रेनच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत आहोत.” असे रशियाकडून सांगण्यात आले होते. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को म्हणाले की युक्रेनमध्ये बेलारशियन सैनिक नाहीत. याशिवाय येथे ना कुठली शस्त्रास्त्रे आहेत ना दारुगोळा. रशियाला अशा मदतीची गरज नाही. त्याचवेळी लुकाशेन्को यांनी युक्रेनला आपला देश गमावायचा नसेल तर त्यांनी वाटाघाटीच्या टेबलावर यावे, असे सांगितले होते.

युद्धा संपून, शांतता नांदणार?

या युद्धाची मोठी झळ युक्रेनला बसली आहे. सुरूवातील या युद्धात युक्रेन एकटा पडल्याचे दिसून आले. मात्र नंतर काही देशांनी युक्रेनला मदत केल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यांनी केला होता. अमेरिकेनेही रशियाला या युद्धामुळे गंभीर इशारा दिला होता. रशियाची आर्थिक रसद तोडणे किंवार तिसरे महायुद्ध जाहीर करणे एवढाच पर्याय असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते. जगातील बऱ्याच देशांकडून रशियाला शांततेच चर्चा करण्याचाही सल्ला देण्यात आला होता. आता युक्रेन जर चर्चेसाठी तयार झाला असेल तर काही काळातच ही परिस्थिती निवळण्याची शक्यता आहे. या युद्धांच्या जखामांतून सावरण्याचे मोठे आव्हान युक्रेनसमोर असणार आहे. यात दोन्ही देशात काय चर्चा होतेय? या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघतो का, हेही पाहणं तितकेच महत्वाचे आहे.

VIDEO: युक्रेनच्या दोन आईल टर्मिनलवर रशियाचा मिसाईल अटॅक, आगडोंब उसळला; दारं, खिडक्या बंद ठेवण्याचं आवाहन

वेदनादायी..! क्षेपणास्त्रांमुळे इमारतींची झाली दुरवस्था, विचलित करतील Ukraineमधली ‘ही’ दृश्यं!

आता दोनच पर्याय; एक तिसरे महायुद्ध किंवा आर्थिक निर्बंध, बायडन रशियावर संतापले