Russia Ukraine War politics: झेलेन्सिकीला घालवून पुतीनना यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण हवंय? एका नावाची जोरदार चर्चा

वोलोदिमीर झेलेन्स्की (volodymyr zelensky) यांच्या जागी यानुकोव्हिच (Viktor Yanukovych) यांना राष्ट्रपती करावं, अशी भूमिका रशियाची असल्याचं समोर आलं आहे.

Russia Ukraine War politics: झेलेन्सिकीला घालवून पुतीनना यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण हवंय? एका नावाची जोरदार चर्चा
वोलोदिमीर झेलेन्स्की, यानुकोश्चिव्ह, पुतीनImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:17 PM

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन (Russia and Ukraine) यांच्यातील युद्धासंबंधी आणखी एक घडामोड समोर येत आहे. रशियाकडून युक्रेनवर लष्करी आक्रमण करण्यात आल्यापासून पहिल्यांदा युक्रेनियन सैन्याला सत्ता स्थापित करण्याचं आवाहन करण्यात आलं. नाटो सदस्य देशात यूक्रेननं सहभागी होऊ नये ही भूमिका रशियाची होती. तर, दुसरी भूमिका ही यूक्रेनचे सध्याचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांना त्यांच्या पदावरुन पायउतार करण्यात यावं ही आहे. या दोन भूमिका घेऊन रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे. वोलोदिमीर झेलेन्स्की (volodymyr zelensky) यांच्या जागी यानुकोव्हिच (Viktor Yanukovych) यांना राष्ट्रपती करावं, अशी भूमिका रशियाची असल्याचं समोर आलं आहे. यानुकोव्हिच हे यापूर्वी युक्रेनचे अध्यक्ष होते. यानुकोव्हिच हे रशियाधार्जिणे आहेत. तर, वोलेदिमीर झेलेन्स्की हे यूरोपियन देशांच्या बाजूनं झुकलेले आहेत. त्यामुळं एकेकाळी देश सोडून पळून जाणाऱ्या यानुकोव्हिच यांना रशियाला युक्रेनचं अध्यक्ष बनवायचं आहे.

ट्विट

यानुकोव्हिच कोण आहेत?

विक्टर यानुकोव्हिच यांना रशियाकडून युक्रेनचे नवीन राष्ट्रपती म्हणून जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. यानुकोव्हिच यांनी 2010 ते 2014 या कालावधीत युक्रेनचे राष्ट्रपती म्हणून काम केलं आहे. 2014 मध्ये यूक्रेनमध्ये क्रांती झाली आणि विक्टर यानुकोव्हिच यांना देश सोडून पळून जावं लागलं होतं. त्यापूर्वी 2006 ते 2007 मध्ये युक्रेनचं पंतप्रधान म्हणून देखील काम केलं आहे. रशिया आणि यूक्रेनमध्ये 2013 मध्ये वादाला सुरुवात झाली. विक्टर यानुकोव्हिच यांच्या विरोधात युक्रेनमध्ये आंदोलन सुरु झालं होतं. ते आंदोलन यानुकोव्हिच यांच्या विरोधात होतं. त्याला अमेरिका आणि यूरोपियन देशांनी पाठिंबा दिला होता. रशियानं यानुकोव्हिच यांना पाठिंबा दिलेला होता. मात्र, युक्रेनच्या जनतेच्या आंदोलनामुळं विक्टर यानुकोव्हिच यांना देश सोडून पळून जावं लागलं होतं.

वोलेदेमीर झेलेन्स्की यांना पदावरुन हटवणार

युक्रेनचे सध्याचे राष्ट्रपती वोलेदेमीर झेलेन्स्की हे युरोपियन आणि अमेरिकन देशांच्या बाजूनं भूमिका घेणारे आहेत. नुकतेच यूक्रेनला युरोपियन यूनियनमध्ये सभासद करुन घेण्यात आलं आहे. आता रशिया व्लादिमीर पुतिन यांच्या जवळचे असलेले विक्टर यानुकोव्हिच यांना युक्रेनचे राष्ट्रपती म्हणून जाहीर करु शकते.

इतर बातम्या :

Breaking News: तिसरं महायुद्ध हे अणूयुद्ध असेल, पुतिनचे इरादे रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याकडून जाहीर

Video: तिरंगा आहे तर सुरक्षा आहे, यूक्रेनमध्ये जेव्हा तुर्की, पाकिस्तान्यांनाही तिरंग्यानं वाचवलं !

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.