Russia Ukraine War : भारताला मिळणाऱ्या शक्तीशाली ब्रम्हास्त्राला अमेरिकेचा खोडा? कसं आहे s-400 मिसाईल?

| Updated on: Mar 02, 2022 | 6:41 PM

भारताला रशियाकडून S-400 नावचे मिसाईल मिळणार आहे. या मिसाईलला ब्रम्हास्त्र मानले जात आहे. कारण हे अत्यंत शक्तीशाली हत्यार आहे. हे भारताला मिळाल्यास भारतीय सैन्याची मोठी ताकद वाढणार आहे.

Russia Ukraine War : भारताला मिळणाऱ्या शक्तीशाली ब्रम्हास्त्राला अमेरिकेचा खोडा? कसं आहे s-400 मिसाईल?
अमेरिकेकडून रशियाच्या कोंडीचा प्रयत्न
Image Credit source: Wikipedia
Follow us on

रशियाला (Russia) आवर घालण्यासाठी आत्ताच्या घडीला अमेरिका (US)अनेक प्रयत्न करत आहे. मात्र अमेरिकेचा विरोध झुगारून रशियाने युक्रेनवर (Ukraine) हल्ला सुरूच ठेवले आहेत. अशात अमेरिका रशियाची कोंड करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या देशांचे रशियासोबत करार झाले होते. त्यांच्यावर अमेरिका आता निर्बंध लादत आहे. भारताचाही एक मोठा करार रशियासोबत झाला आहे. भारताला रशियाकडून S-400 नावचे मिसाईल मिळणार आहे. या मिसाईलला ब्रम्हास्त्र मानले जात आहे. कारण हे अत्यंत शक्तीशाली हत्यार आहे. हे भारताला मिळाल्यास भारतीय सैन्याची मोठी ताकद वाढणार आहे. भारताने रशियाकडून क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. भारताने आपला निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितावर आधारित असल्याचा आग्रह धरला आहे. यूएस परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी गुरुवारी आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, “S-400 प्रणालीबद्दल आम्हाला असलेल्या चिंता बदललेल्या नाहीत.” त्यामुळे काहीसा संभ्रम तायर झाला आहे. अमेरिका आता यात खोडा घालणार का? अशी शंका उपस्थित झाली आहे

भारत आपल्या भूमिकेवर ठाम

रशियन S-400 प्रणालीचा अमेरिका-भारत संबंधांवर काय परिणाम होईल, असा प्रश्न विचारल्यार ते म्हणाले, रशियाची भूमिका ही काहीशी अस्थिरता निर्माण करणारी आहे. युक्रेनवर अमेरिका आणि रशिया वेगवेगल्या पद्धतीने व्यक्त होत असताना अमेरिकेच्या वतीने हे सूचक विधान करण्यात आले आहे. अमेरिकेचा तीव्र आक्षेप आणि जो बायडेन प्रशासनाकडून निर्बंधांचा इशारा देऊनही, भारताने क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याच्या निर्णयात कोणताही बदल करण्यास नकार दिला आहे. “भारत असो किंवा इतर कोणताही देश, आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की, शस्त्रास्त्र प्रणालींबाबत रशियाशी कोणताही नवीन व्यवहार टाळावा,” असे प्राइस म्हणाले. आहेत.

काय आहे S-400 मिसाईल?

S-400 प्रणालीबद्दल माहिती घ्यायची झाल्यास यात एक शक्तिशाली रडार आहे, ज्याला आपण संरक्षण प्रणालीचे ब्रम्हास्त्र म्हणू शकतो. हे वेगवेगळ्या दिशेने अनेक टार्गेट शोधू शकते आणि शत्रूची लढाऊ विमाने, बॉम्बर किंवा क्षेपणास्त्रे हल्ला करण्यापूर्वी त्यांना नष्ट करू शकते. वेगवेगळ्या श्रेणीतील क्षेपणास्त्रांचा वापर करून ते शत्रूला धोका निर्माण करू शकतात. ते इतके प्रगत आहे की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील विमानतळांवरून उडणाऱ्या चिनी लढाऊ विमानांचा मागोवा घेणे शक्य झाले होते. ज्याच्या मदतीने भारत कोणत्याही धोक्याचा वेळीच सामना करू शकतो. त्यामुळे भारताच्या लष्करी ताफ्यात हे ब्रम्हास्त्र सामील होण्यााची गरज आहे.

रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर होईल गंभीर परिणाम, 30% पर्यंतचा निचांक गाठू शकतो शेअर बाजार

अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ! रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच संसारात विष, नवऱ्यासह कुटुंबातील सर्वांना विष पाजून मुद्देमाल घेऊन नवरी फरार