ट्रम्प यांचा पुरस्कार हुकला, भारताचे खास मित्र नाराज, काय म्हणाले? वैश्विक पातळीवर मोठं काही घडणार?

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आयुष्यातील सर्वाधिक वाईट दिवस आजचा असावा. मागील काही दिवसांपासून ट्रम्प सतत नोबेल शांतता पुरस्कारासाठी दावा करताना दिसले. मात्र, आज प्रत्यक्षात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि कुठेही ट्रम्प यांचे नाव दिसले नाही.

ट्रम्प यांचा पुरस्कार हुकला, भारताचे खास मित्र नाराज, काय म्हणाले? वैश्विक पातळीवर मोठं काही घडणार?
Donald Trump and Vladimir Putin Nobel Prize
| Updated on: Oct 10, 2025 | 8:08 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक प्रयत्न करूनही नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही. काही देश थेट नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांनाच मिळाला, याकरिता मैदानात उतरले होते. जगातील आठ युद्ध रोखून अनेक लोकांचे जीव वाचवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी केला. विशेष म्हणजे नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा करण्याच्या काही तास अगोदरच त्यांनी मोठी घोषणा करत हमास-इश्त्रायलच्या युद्धबंदीबाबत करार झाल्याचे जाहीर केले. 20 कलमी करारातील पहिला टप्प्याला शनिवारपासून सुरूवात होणार असल्याचे म्हटले. मात्र, इतकी प्रयत्न करूनही त्यांना नोबेल पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार मिळाला नसल्याने रशिया आणि इस्त्रायने मोठे भाष्य केले.

युक्रेन-रशिया युद्ध थांबण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प रशियावर दबाव टाकताना दिसले. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी भेट देखील घेतली. मात्र, रशिया आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे पाहून थेट रशियाला धमकावण्याचा प्रयत्नही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. रशियाने देखील अमेरिकेला हल्ल्याची धमकी दिली. मात्र, तणावाचे वातावरण असताना रशियाने मोठी चाल करत डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला पाहिजे, असे थेट म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मोठे विधान केले. पुतिन यांनी म्हटले की, ट्रम्प खरोखरच शांततेसाठी खूप काम करतात आणि मध्य पूर्वेतील युद्धबंदी हा यामध्ये एक महत्वाचा भाग आहे. पुतिन यांनी लगेचच पुढे स्पष्ट केले की, हे त्यांचे काम नाही की, खरोखरच डोनाल्ड ट्रम्प हे नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी योग्य व्यक्ती होते की नाही.

जर गाझा पट्टी शांत झाली तर डोनाल्ड ट्रम्प यांची ही मोठी ऐतिहासिक कामगिरी म्हणावी लागेल, असेही पुतिन यांनी म्हटले. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळाला नसल्याने निराशा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, नोबेल पुरस्कार समिती शांतीवर बोलते…डोनाल्ड ट्रम्प प्रत्यक्षात शांती प्रस्तापित करण्याचे काम करतात. यासोबतच त्यांनी थेट म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प हेच खरे नोबेल शांतता पुरस्कारासाठी हकदार आहेत.