रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे भारतीय लोकांबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, भारतीय लोक कधीच…

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकताच युरोपियन देशांबद्दल अत्यंत मोठे विधान केले आहे. हेच नाही तर त्यांनी थेट मोठा इशारा दिला आहे. जर्मनीकडून करण्यात येत असलेल्या आरोपांवर देखील बोलताना ते दिसले आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे भारतीय लोकांबद्दल मोठे विधान, थेट म्हणाले, भारतीय लोक कधीच...
Vladimir Putin
| Updated on: Oct 03, 2025 | 2:10 PM

युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाचा युरोपसोबत तणाव वाढताना दिसतोय. आता पुन्हा एकदा मोठा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युरोपियन देशांना दिला. रशियाला कोणत्याही प्रकारची चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्यास उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट म्हटले. रशिया-युक्रेन युद्धाची प्रत्यक्ष झळ भारताला देखील बसत आहे. याच युद्धामुळे अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. भारताने देखील हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केला. अमेरिका भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकत आहे. याच महिन्यात पुतिन हे भारत दाैऱ्यावर येणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. पुतिन यांनी भारताबद्दल अत्यंत मोठे विधान केले.

पुतिन यांनी म्हटले की, मी पंतप्रधान मोदींना ओळखतो. भारतातील लोक कधीच अपमान सहन करणार नाहीत. मी भारत आणि चीनसारख्या देशांचे आभार मानतो…त्यांनी ब्रिक्सची स्थापना केली. पुतिन यांनी भाषणात म्हटले की,  जागतिक राजकारणात भारताचा संतुलित दृष्टिकोन खरोखरच कौतुकास्पद आहे. रशिया नक्कीच भारताला एक महत्वाचा आपला भागीदार मानतो.

जर्मनीचे नाव घेत पुतिन यांनी म्हटले की,  युरोपमधील सर्वात शक्तिशाली सैन्य उभारण्याचे स्वप्न पाहत आहेत. युरोप एकजूट असलेले उच्चभ्रू लोक सतत युद्धाची भीती निर्माण करतात. रशियाने कधीही नाटो देशांवर हल्ला केला नाही. हे फक्त एखाद्या मंत्रासारखे सांगितले जातंय. रशिया कधीही नाटो सदस्य देशावर हल्ला करेल यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे.

मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, चांगली झोप घ्या, आराम करा आणि स्वत:च्या घरी काय सुरू आहे हे पाहा आणि युरोपिय देशांच्या शहरातील रस्त्यावर काय सुरू आहे हे पाहा. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी देखील शीतयुद्धाशी केलेली तुलना नाकारली. रशिया आणि युक्रेन युद्धात आता नाटो देशांनी उडी घेतल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर जर्मनीच्या विमानतळावर रशियाचे ड्रोन दिसल्याचेही सांगितले जातंय. ड्रोन दिसल्याने काही वेळ विमानतळ बंद ठेवण्यात आले आणि एकच खळबळ उडाली.