
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल रात्री भारतात दाखल झाले. पुतिन दोन दिवसाच्या भारत दाैऱ्यावर आहेत. पुतिन यांना जगातील सर्वाधिक शक्तीशाली नेते म्हणून बघितले जाते. त्यांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जाते. हेच नाही तर पुतिन ज्या विमानातून प्रवास करतात ते साधे विमान नसून अत्यंत घातक विमान आहे. पुतिन यांची रूम ज्या हॉटेलमध्ये असते, त्या हॉटेलच्या पूर्ण मजला त्यांच्या सुरक्षेसाठी खाली केला जातो.पुतिन आपल्या सुरक्षेसाठी इंटरनेटचाही अजिबात वापर करत नाहीत. सोशल मीडियापासून ते दूर असून त्यांच्याकडे साधा स्मार्टफोन देखील नाहीये. त्यांच्याकडे असलेल्या फोनमध्ये इंटरनेट सुद्धा नाहीये. पुतिन यांनी इंटरनेट न वापरण्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. पुतिन यांनी इंटरनेटच्या विषयावरून अमेरिकेवर गंभीर आरोप केली होती.
पुतिन यांनी इंटरनेटचे वर्णन थेट सीआयए प्रकल्प म्हणून केले होते. सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे. जी अत्यंत धोकादायक आहे. एप्रिल 2o14 मध्ये व्लादिमीर पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, इंटरनेट म्हणजे सीआयएचा मोठा प्रकल्प आहे. ज्याच्या माध्यमातून सर्वांवर लक्ष ठेवले जाऊ शकते.
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने इंटरनेय तयार केले आहे आणि त्यांच्याकडून त्याचा अजून विकास केला जात आहे. 2013 च्या सुरुवातीला अमेरिकन गुप्तचर संस्था एनएसएचे माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन यांनी मोठा खुलासा केला होता. त्यांनी म्हटले होते की, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने अमेरिका सोशल मीडियावर हेरगिरी करते.
रशियाला आपले स्वत: चे एक वेगळे इंटरनेट हवे आहे. पुतिन यांनी बराच काळ आग्रह धरला. सध्याचे इंटरनेट रशियाच्या हितसंबंधांना धोका निर्माण करत आहे, असे त्यांचे मत आहे. रशियाने आपल्या ऑनलाइन हितसंबंधांचे रक्षण केले पाहिजे असे स्पष्ट मत पुतिन यांचे आहे. यामुळे ते सोशल मीडियावर सक्रिय नाहीत आणि ते इंटरनेट असलेला फोन देखील वापरत नाहीत.