3 कोटींच्या घरात शिफ्ट होताच घडलं अक्रीत! पत्नीचा चेहरा सुजला, त्वचेला चिरा, वाहायला लागले रक्त घळाघळा, त्या घरात घडलं तरी काय?

Sarah Smith and Colin : या दाम्पत्यानं 3 कोटींचं महागडं घर खरेदी केलं. पण या आनंदावर विरजण पडलं. कारण त्याच्या पत्नीची सारा स्मिथ वारंवार आजारी पडू लागली. मग असं कारण पुढं आलं.

3 कोटींच्या घरात शिफ्ट होताच घडलं अक्रीत! पत्नीचा चेहरा सुजला, त्वचेला चिरा, वाहायला लागले रक्त घळाघळा, त्या घरात घडलं तरी काय?
काय घडलं अक्रीत
| Updated on: Aug 24, 2025 | 2:05 PM

प्रत्येकाला वाटतं की आपलं एक घर असावं. अमेरिकेतील ओहायो राज्यातील सारा स्मिथ आणि तिचे पती कॉलिन यांनी मे 2024 मध्ये आलिशान आणि शानदार घरं खरेदी केलं. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आनंदावर विरजण पडलं. कारण या घरात दाखल होताच स्मित सारखी आजारी पडायला लागली. जेव्हा कारण समजलं, तेव्हा त्यांना धक्काच बसला.

या दाम्पत्याने ओहायो येथे जवळपास 3.3 कोटींचे घर खरेदी केले. स्मिथ आणि कॉलिन या घरात दाखल होताच. दुसऱ्या दिवशीपासून स्मिथला आजारपण जडलं. ती वारंवार तापानं फणफणू लागली. तिला सर्दी-पडसं झालं. तिला डॉक्टरांकडं नेण्यात आलं. गोळ्यांनी तिला थोडं बरं वाटलं. पण हा इलाज तात्पुरताच ठरला. कारण हा आजार बळावला. आता तर स्मिथच्या डोळ्यांखाली लाल डाग आणि त्याला खाज येऊ लागली. तिथली त्वचा फाटून थेट रक्त येऊ लागले.

साराने सोशल मीडियावर मागितली मदत

या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला. कारणही समोर येईना आणि इलाजाने पण बरं वाटेना अशी स्मिथची अवस्था झाली. मग तिने तिचे हे दुःख सोशल मीडियावर मांडलं. तिच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला. तिला अनेकांना अनेक सल्ले दिले. त्यात काही जणांनी फंगस (मोल्ड) ही नवीन घरातील समस्या असल्याचे सांगितले.

स्मिथ आणि कॉलिने मग एका विशेष प्रशिक्षित मोल्ड डॉगला बोलावले. त्यातून या घरातील प्रत्येक कोपऱ्यात पावसामुळे फंगस असल्याचे समोर आले. सर्वाधिक फंगस हे कार्पेट आणि भिंतींना आढळून आले. जुन्या घर मालकाने घर गळती लपवण्यासाठी छतावर पांढरा रंगाचा दाट थर लावला होता. पण घरात फंगस वाढले होते. ते दोघांच्याही लक्षात आले नाही. स्मिथ यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. उपचारांसाठी त्यांचा सहा महिन्यात मोठा खर्च झाला होता. त्यांना घरातील डागडुजी आणि गळती रोखण्यासाठी जवळपास 8.3 लाख रुपये लागले. विशेष म्हणजे विमा कंपनीने सुद्धा त्यांना कोणतीही मदत केली नाही. इतकेच कमी की काय, त्यांनी खरेदी केलेल्या जवळपास 90 टक्के वस्तूंवर फंगसचे दाट जाळे झाल्याने त्या त्यांना फेकून द्यावं लागलं.

या सर्व प्रकारामुळे स्मिथला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कॉलिन दिवसभर ऑफिसच्या कामानिमित्त, मिटींगमुळे घराबाहेर राहत असल्याने त्यांना या फंगसाचा इतका त्रास झाला नाही. पण स्मिथवर फंगसाचा मोठा दुष्परिणाम झाला. पुढे या आलिशान घराला कंटाळून स्मिथ तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली. तिथे तिच्या तब्येतीत मोठी सुधारणा झाली. पण ती पुन्हा घरी परतल्यावर तिला फंगसचा त्रास झाला. तिने ही स्टोरी सोशल मीडियावर शेअर केल्यावर एका ऑनलाईन फंड रेझिंग कॅम्पेनमध्ये तिच्यासाठी लोकांनी 5000 डॉलरचा निधी उभारला. त्यामुळे या दाम्पत्यावरील आर्थिक बोजा कमी होण्यास हातभार लागला.