बापानेच पांडुरंगासमोर कधी डोकं टेकवलं नाही, पोरीकडून काय अपेक्षा करणार? वारकरी संप्रदायातून सुप्रिया सुळेंना खोचक टोला; कोणी केली टीका?
Supriya Sule : भारत हा विविध खाद्यसंस्कृती जपणारा देश आहे. पण सध्या शाकाहार आणि मांसाहारावरून राजकारण तापलं आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांनी मी मांसाहार केलेलं माझ्या पांडुरंगाला चालतं असे विधान केले. त्यावरून आता वाद पेटला आहे.

श्रावण कालच संपला. अनेकांनी एक महिना तोंडावर सयंम ठेवला होता. श्रावणात अनेक जण मांसाहार करत नाहीत. श्रावण संपताच मांसाहारावरून पुन्हा राजकारण तापले. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मांसाहाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मी मांसाहार केलेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम? अशा त्यांच्या वक्तव्याने वादंग उठले आहे. त्यावर आता दोन्ही बाजूने हल्लाबोल सुरू झाला आहे.
सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने वादंग
मी रामकृष्ण हरी वाली आहे. फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरं बोलते, मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही आणि खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया यांनी केला. त्यांच्या या विधानानं वादळं उठलं. पांडुरंगाला मांसाहार करणं चालतं असं म्हणणं मूर्खपणा असल्याचे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले. तर तुम्ही काय खाताय ते सार्वजनिक सांगण्याची गरज नसल्याचे भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले. त्यातच भाजपने लोकांनी काय खावं आणि काय खाऊ नये हे सांगू नये असा विरोधाकांनी हल्ला केला.
वारकऱ्यांकडून वक्तव्याचा खरपूस समाचार
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा वारकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला. बापानी कधी पांडुरंगाच्या चंरणी डोक टेकलं नाही तर मुली कडून काय आपेक्षा करणार अशी जहरी टीका आळंदीचे ह.भ.प.बाळासाहेब महाराज खरात यांनी केली. त्यांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अन्यथा वारकरी संप्रदाय त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करू असा इशारा ह.भ.प बाळासाहेब महाराज खरात यांनी दिला.
सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्या मुळे वारकरी संप्रदायामध्ये आक्रोश आहे.असं वक्तव्य शहाण्या माणसाचं लक्षण नाही. वारकरी संप्रदायांनी सुप्रिया सुळेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. सुप्रिया सुळेंनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं यामध्ये कुठेही वारकरी संप्रदायाचा अपमान करू नये. बापानी कधी पांडुरंगाच्या चंरणी डोक टेकल नाही तर मुली कडून काय आपेक्षा करणार असे हभप खरात महाराज म्हणाले.
पृथ्वी तलावावर एकच विठ्ठल आहे दोन विठ्ठल नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी केलेले हे वक्तव्य निषेधार्थ आहे याचा आम्ही वारकरी पाईक संघाकडून निषेध व्यक्त करतो त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे विठ्ठलाला अभक्ष भक्षण चालतं अशी भीती खरात महाराजांनी व्यक्त केली.
वारकरी सांप्रदायाने लोकांना मद्य आणि मांस यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. याचा कुठेतरी सुप्रिया सुळे यांच्याकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाराजांनी केला. भगवान विठ्ठल हा सर्वांचाच माता-पिता आहे. भगवान विठ्ठलाने सर्व जीव जंतू तयार केले आहेत. त्यांची हत्या करून भक्षण करणे हे त्या मात्यापित्याला म्हणजेच विठ्ठलाला नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य निषेधार्हय आहे.
वारकऱ्यांच्या पांडुरंगाला बळी दिलेला चालत नाही त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा पांडुरंग कोणता दोन पांडुरंग आहेत का असा प्रश्न कबीर महाराजांनी उपस्थित करत या वक्तव्याचा निषेध केला. मौस खाता हौस करी जोडूनी वैरी ठेवीला या संत वचनानुसार वारकरी संप्रदाय चालतो या वक्तव्याचा विपर्यास करून सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान निषेधार्य आहे, असे खरात महाराज म्हणाले.
