Saudi Arabia-America : मोठी बातमी, सौदी अरेबियाने अमेरिकेला दिला मागच्या 50 वर्षातील सर्वात मोठा झटका

Saudi Arabia-America : अजूनही सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पण बदलत्या काळानुसार या संबंधांत अनेक चढ-उतार येत आहेत. जागतिक राजकारणातील काही गोष्टींवरुन दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. सौदी अरेबियाने आता अमेरिकेला मागच्या 50 वर्षातील सर्वात मोठा झटका दिला आहे.

Saudi Arabia-America : मोठी बातमी, सौदी अरेबियाने अमेरिकेला दिला मागच्या 50 वर्षातील सर्वात मोठा झटका
saudi arabia -America
| Updated on: Jun 14, 2024 | 11:02 AM

सौदी अरेबियाची चीन-रशिया या देशांबरोबर जवळीक वाढत आहे. सौदीच्या बाजारात अमेरिकेच वर्चस्व कमी होत चाललय. सौदी आपल्या व्यवसायाचा विस्तार करुन रशिया, चीन, जपान या देशांबरोबर आपले द्विपक्षीय संबंध मजबूत करत आहे. आता सौदी सरकारने एक मोठ पाऊल उचलत अमेरिकेला झटका दिला आहे. सौदीने अमेरिकेसोबत मागच्या 50 वर्षांपासून सुरु असलेली पेट्रो डॉलर करार पुढे कायम चालू ठेवण्यास नकार दिला आहे. 9 जूनलाच दोन्ही देशांमधील हा करार संपला. जगभरातील व्यापारात अमेरिकन डॉलरऐवजी दुसऱ्या करन्सीला म्हणजे चलनाला प्रोत्साहन देणं या दृष्टीने सौदीच्या या निर्णयाकडे पाहिल जातय. याचा थेट परिणाम अमेरिकेवर दिसून येईल. जगभरात आर्थिक दृष्टीने अमेरिकेचा जो धाक निर्माण झाला, त्यात सौदी सोबतची डील महत्त्वाची ठरली होती.

1970 च्या दशकात इस्रायल युद्धानंतर ऑइल संकट निर्माण झालं. त्यावेळी अमेरिकेने सौदीसोबत पेट्रो डॉलरचा करार केला. या डीलच्या बदल्यात अमेरिकेने सौदी अरेबियाला संरक्षणाची गॅरेंटी दिली होती. अमेरिकेला त्याचे अनेक फायदे झाले. पहिल म्हणजे अमेरिकेला सौदीकडून तेल मिळालं. त्यानंतर जगभरात त्यांच्या करन्सीचे रिझर्व्ह वाढू लागले. जाणकारांच्या मते अमेरिकेसाठी ही डील WIN-WIN कंडीशन होती. म्हणजे प्रत्येक बाजूने विजय.

सौदी अरेबिया अजून कुठल्या करन्सीमध्ये तेल विकणार?

सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा कच्चा तेलाचा निर्यातक देश आहे. सौदीकडून अनेक देशांना तेलाची विक्री होते. बिरिक्स न्यूजनुसार सौदी अरेबिया आता अमेरिकी डॉलरशिवाय चिनी RMB, युरो, येन, रुपये आणि युआन सहीत अन्य करन्सीमध्ये तेल विकणार आहे.


अमेरिकेसोबत मतभेद कशावरुन?

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या नेतृत्वात सौदी अरेबियाचे चीन आणि रशियासोबत घट्ट मैत्रीसंबंध विकसित होत आहेत. अमेरिकेसोबत मध्य पूर्वेतील सुरक्षेवरुन मतभेद झाले, त्यानंतर भूमिकेत हा बदल झालाय. बायडेन राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी येमेनच्या हूती बंडखोरांना दहशतवाद्यांच्या यादीतून हटवलं होतं. गाजा युद्धातील अमेरिकेच्या भूमिकेवरुन सौदी प्रशासन आणि अमेरिकेत मतभेद आहेत.