AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha Video : एका बाजूला वडील, तर दुसरीकडे पती.. शत्रुघ्न सिन्हा आणि जहीर इक्बालसोबतचा सोनाक्षीचा तो व्हिडीओ समोर

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करतात. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Sonakshi Sinha Video : एका बाजूला वडील, तर दुसरीकडे पती.. शत्रुघ्न सिन्हा आणि जहीर इक्बालसोबतचा सोनाक्षीचा तो व्हिडीओ समोर
Sonakshi Sinha
| Updated on: Dec 20, 2025 | 11:53 AM
Share

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही नेहमी चर्चेत असते. जहीर इक्बाल याच्यासोबत तिथे आंतरधर्मीय लग्न केल्यावर बऱ्याच जणांनी तिच्यावर टीका केली होती. पण सोनाक्षी आणि जहीर या दोघांनीही त्याकडे फार लक्ष न देता आपलं नातं मजबूत ठेवलं आहे. सोाक्षीचे वडील, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे या नात्याबद्दल बरेचदा बोलले आहेत. दरम्यान आता सोनाक्षीचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामुळे तिचे चाहते मात्र चांगलेच आनंदले आहेत. शत्रुघ्न सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा वाढदिवस नुकताच झाला, त्याच्या सेलिब्रिशनचा व्हिडीओ व्हायर झाला असून एका बाजूला वडीव, तर दुसऱ्या साईडला पती जहीर, मध्ये सोनाक्षी, असा केक कटिंगचा हा व्हिडीओ असल्याचे दिसते. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सेलिब्रेशन करत असल्याचे दिसत असून. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची काही झलकही चाहत्यांना पहायला मिळत आहे.

वडील व पती यांच्यासोबत सोनाक्षीचे सेलिब्रेशन

खरंतर, बॉलिवूड अभिनेत्री पूजा रूपारेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांचे जावई झहीर इक्बाल यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. पूजाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, सोनाक्षी सिन्हा तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पती झहीर इक्बाल यांच्यामध्ये बसलेली होती. नंतर तिने त्या दोघांचा हात धरून, एकत्र केक कापला.यावेळी सोनाक्षी खूप खुश दिसील, तिच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होते. या व्हिडीओ सासरेबुवा शत्रुघ्न सिन्हा यांचा जावईबापू जहीर इक्बाल याच्यासोबतचं बाँडिंग दिसलं. केक कापल्यावर त्यांनी तो एकेकांना प्रेमानेही भरवला.

दोघांचाही डिसेंबरमध्येच वाढदिवस

आणखी एका व्हिडीओमध्ये दिग्दर्शक रमेश सिप्पी हे त्यांच्या मित्राची बर्थडे पार्टी एन्जॉय करताना दिसतात. तर सोनाक्षी सिन्हा हिची पूनम याही पार्टीत हसताना दिसत होत्या, कुटुंबाचा आनंद पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसलं. शत्रुघ्न सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या वाढदिवसात अवघ्या एका दिवसाचे अंतर आहे. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न 9 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करतात, तर झहीर इक्बालचा वाढदिवस 10 डिसेंबरला असतो. तिच्या वडिलांच्या आणि पतीच्या वाढदिवसानिमित्त, सोनाक्षीने सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील दोन सर्वात महत्त्वाच्या पुरुषांना शुभेच्छा दिल्या.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.