
काहिरा: इजिप्तच्या लक्सरजवळ जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वाधिक चर्चित परिसरापैकी एक कर्नाक मंदिर अनेक वर्षांपासून लाखो पर्यटकांचे आणि पुरातत्ववाद्यांचे आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. याची प्रारंभिक संरचना केव्हा तयार झाली आणि या जागेची निवड का झाली ? या संदर्भात दशकांहून अधिक काळ वाद सुरु आहेत. आता नव्या भू-पुरातात्विक अध्ययनामुळे या मंदिर परिसरासंदर्भात आतापर्यंत या मंदिराच्या निर्मितीबाबतच्या अंदाजांना तडा बसला आहे. नव्या अभ्यासात मंदिराचे वय, इजिप्तची पौराणिक कथांशी जवळचा संबंध आणि ३००० वर्षात याच्या विकासासंदर्भात नवीन पुरावा सापडला आहे.
सध्या थेब्समध्ये नाईल ( नील ) नदीच्या सुमारे ५०० मीटर पूर्वमध्ये स्थित कर्नाक जगातील सर्वात रहस्यमय प्राचीन मंदिरांचा परिसर मानला जात आहे. आता या मंदिराबाबत उप्पसला विद्यापीठाचे डॉ.एंगस ग्राहम आणि साऊथएम्पटन विद्यापीठाचे डॉ.बेन पेनिंगटन यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने आतापर्यंत सर्वात स्पष्ट कालावधी जाहीर केला आहे. एंटीक्विटी पत्रिकेत ६ ऑक्टोबर रोजी प्रकाशित अभ्यासात त्यांनी सांगितले की मंदिराच्या सुरुवातीच्या कब्जाचा संबंध प्राचीन साम्राज्याशी आहे, हे साम्राज्य २५९१ आणि २१५२ ईसा पूर्व दरम्यान होते.
त्यांनी इतिहासातील कागदपत्रांचा दुजोरा देत सांगितले की २५२० ईसवी सन पूर्व हे स्थळ नदीच्या दरम्यानचे बेट होते. जे राहण्यासाठी योग्य नव्हते. नंतर नाईल नदीचा प्रवाह बदलला आणि ही जमीन उंच जमीनीच्या तुकड्यात बदलली गेली. काही विद्वानांच्या मते कर्नाकचे संस्थापकांनी जाणून बुजून या जादी सुर्य देवता रा या अमुन-रा च्या प्रलयकारी पाण्यापासून उदय होण्याची कहाणी दाखवण्यासाठी याची निवड केली होती.
अभ्यास हेही स्पष्ट करतो की प्राचीन इजिप्तच्या लोकांनी नदीला आपल्या गरजेनुसार कसे बदलले, वाळवंटाचील रेती पासून जमीनला सपाट कसे केले आणि जुन्या गाळाने भरलेल्या कालव्यांवर कसे बांधकाम केले. हे या बाबीची साक्ष आहे की कशी मिथक पुराणकथा , पर्यावरण आणि अभियांत्रिकी यांनी एकत्रितपणे प्राचीन काळातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एकाला जन्म दिला.