AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला एकमेव अब्जाधीश, ज्याने तोडले श्रीमंतीचे सारे रेकॉर्ड, सोने लादलेले १०० ऊंट, ६० हजार नोकर

जगात सर्वात श्रीमंत म्हणून तुम्ही Amazon चा संस्थापक जेफ बेजोस यांना ओळखत असाल, परंतू जगाच्या इतिहासात एक असाही श्रीमंत होऊन गेला आहे त्याची संपत्ती आजच्या सर्व श्रीमंतापेक्षा अधिक होती.

जगातला एकमेव अब्जाधीश, ज्याने तोडले श्रीमंतीचे सारे रेकॉर्ड, सोने लादलेले १०० ऊंट, ६० हजार नोकर
| Updated on: Nov 09, 2025 | 5:42 PM
Share

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती Amazon चा संस्थापक जेफ बेजोस बाबत आपल्या माहिती आहे. परंतू इतिहासात एक असाही अब्जाधीश होऊन गेला ज्याची संपत्ती आजच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीहून अधिक होती. त्याच्या समोर इलॉन मस्क आणि मुकेश अंबानी काहीच नाहीत. आपण बोलत आहोत १४ व्या शतकातील आफ्रीकी सम्राट मनसा मूसा याच्या बाबत. जे पृथ्वीवरील कदाचित सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.आणि आजपर्यंत पृथ्वीवर त्यांच्या इतका श्रीमंत कोणी नाही.

400 अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती

मनसा मूसा यांचा जन्म १२८० मध्ये झाला होता. ते १३१२ ई.मध्ये पश्चिम आफ्रीकेच्या विशाल माली साम्राज्याच्या सिंहासनावर राज्य करत होते. जर आजच्या हिशेबाने मूसाच्या संपत्ती मोजदाद केली तर तिची किंमत ४०० अब्ज डॉलर होती. ही संपत्ती आजच्या आधुनिक काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोसच्या संपत्तीच्या दुप्पट आहे. एवढेच काय आजचे श्रीमंत लोक मूसा यांच्या समोर कमीच आहेत. मूसा यांची संपत्ती त्यांच्या राज्यातील नैसर्गिक साधन संपत्तीमुळे वाढली होती. मालीतील बंबुक, वंगारा, ब्यूर, गलाम आणि तगाजा येथील सोन्याच्या खाणी होत्या. मुसाने आयवरी कोस्ट, सेनेगल, माली आणि बुर्किना फासो सह अनेक समकालीन आफ्रीकी देशांवर राज्य केले. मूसाची शाही राजधानी टिम्बकटू होती.

करुणा आणि दयेसाठी प्रसिद्ध

मनसा मूसा त्याच्या करुणा आणि दयेसाठी ओळखले जाते. असे म्हटले जाते की त्यांच्याकडे मदतीसाठी आलेल्यांना ते सोन्याने मढवून पाठवत. लंडन स्कूल ऑफ आफ्रीकन एण्ड ओरिएंटल स्टडीजच्या लुसी ड्युरेन यांच्या मते मनसा मूसा प्रचंड दानशूर होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे इतिहासात कौतूक केले जाते. या सम्राटाकडे नैसर्गिक संपत्तीने भरलेली जमीन आणि खाणी होत्या. त्यामुळे त्यांचे भाग्य फळफळले.

मक्का यात्रेने इतिहासात नाव

मनसा मूसा १३२४ मध्ये हजयात्रेसाठी मक्काला गेले होते. या यात्रेमुळे त्यांचे नाव आजही इतिहासात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखळे जाते. बीबीसीच्या बातमी अनुसार,हजसाठी निघालेला त्यांचा कारवाँ सहारा वाळवंट ओलांडून पार करणारा आतापर्यंत सर्वात मोठा कारवा होता. या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की मनसा मूसा सोने लादलेले १०० ऊंट, १२,००० नोकर आणि ६० हजार गुलामांसह मक्का, सौऊदी अरबच्या यात्रेसाठी निघाले होते. इतिहास कारांच्या मते मूसा यांनी १८ टन सोने आणले होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की वर्तमान काळात याची किंमत सुमारे एक अब्ज डॉलरच्या आसपास आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.