AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात मोठी खळबळ, विमानाच्या अपहरणाचा प्रयत्न? थेट दुबईहून..

दुबईहून तेल अवीवकडे जाणारे एक विमान साैदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असतानाच थेट परत फिरल्याचे वृत्त आले. यासोबतच या विमानाकडून असे काही संदेश पाठवण्यात आली, ज्याने खळबळ उडाली. या विमानाचे अपहरण झाल्याचे संदेश पाठवले.

जगात मोठी खळबळ, विमानाच्या अपहरणाचा प्रयत्न? थेट दुबईहून..
Tabuk Airpor
| Updated on: Sep 30, 2026 | 1:23 PM
Share

दुबईहून तेल अवीवकडे जाणारे एक विमान साैदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असतानाच थेट परत फिरल्याचे वृत्त आहे. आर्मी रेडिओने दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने विमान अपहरण झाल्याच्या प्रयत्नाशी संबंधित आपत्कालीन संकेत जारी केला. मदतीसाठीचा संदेश (डिस्ट्रेस सिग्नल) पाठवला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. FZ1073 ने सुरुवातीला 7700 हा संकेत दिला होता, हा संदेश आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाठवला जातो. त्यानंतर पुन्हा तो बदलून थेट 7500 हा संदेश पाठवला. बेकायदेशीर हस्तक्षेप दर्शवणारा हा संदेश आहे. त्यानंतर परत एकदा विमानाने 7700 या संकेत पाठवला. या विमानाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती. या विमानाचे अपहरण झाल्याचे सांगितले जात होते.

हेच नाही तर सुरुवातीच्या वृत्तांमध्ये वैमानिकांमधील झटापटीचा उल्लेख आहे. नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री यांच्यात बैठक झाली. या घटनेने जगात मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण 180 प्रवासी होते आणि त्यापैकी 150 प्रवासी इस्रायली असल्याचीही माहिती मिळतंय. विमानाने साैदी अरेबियाहून जाताना अचानक आपला रस्ता बदलला.

त्यानंतर आपत्कालीन संदेशही पाठवला. त्यानंतर थेट हे विमान साैदी अरेबियाच्या ताबुक विमानतळावर सुरक्षित उतरले. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने सर्वात अगोदर 7700 कोड पाठवला. त्यानंतर विमानाने 7500 कोड पाठवला. हा कोड अपहरणसंदर्भात पाठवला जातो. त्यानंतर हे विमान साैदीकडे गेल्याचे कळाले. यासर्व गोष्टी सुरू असतानाच हे विमान ताबुक एअरपोर्टला पोहोचले. लँडिंगनंतर हे विमान फ्लाईट ट्रॅकिंग साइट्सवर दिसले नाही.

इस्त्रायलच्या सुरक्षा सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आणीबाणीची स्थिती आणि बेकायदेशीर हस्तक्षेपाचे संकेत देणारा सिग्नल पाठवण्यामागे विमानावरील वैमानिकांमधील वाद हे कारण असू शकते. मात्र, याबाबत अजून अधिकची माहिती काही मिळू शकली नाही. या घटनेनंतर, इस्रायली हवाई दलाची लढाऊ विमाने त्या विमानाकडे रवाना करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. त्या विमानावर लक्ष ठेवण्यासाठी इस्रायली लढाऊ विमाने पाठवण्यात आली.मात्र, या घटनेने एकच मोठी खळबळ उडाली.

Follow Us
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...