
प्रत्येक नवरा आणि बायकोमध्ये नेहमीच तू तू मैं मैं सुरु असते. पण एखाद्या बाईला तिच्या नवऱ्याचे बाहेर अफेअर आहे हे कळाले तर ती अतिशय टोकाची भूमिका घेते. पण असेच एक प्रकरण जेव्हा कोर्टात गेले आहे तेव्हा कोर्टाने जो निर्णय घेतला तो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. आता नेमकं काय झालं? कोर्टाने त्या महिलेला काय शिक्षा दिली? वाचा सविस्तर…
नेमकं काय घडलं?
हेनान प्रांतात (चीन), नियू ना नावाच्या महिलेला तिच्या पती गाओ फेई याच्या ५ वर्षांच्या अफेअरचा खुलासा करावा लागला. तिने डौयिन (चीनी टिकटॉक) वर पतीने लग्नाच्या पैशांचा वापर करून प्रेयसी हान (विवाहित सहकारी) ला सोन्याचे दागिने, कपडे, मेकअप इत्यादी भेटी दिल्याचे, चॅट रेकॉर्ड्स, फोटो आणि पतीला प्रेयसीच्या नवऱ्याने मारहाण केल्याचे पुरावे पोस्ट केले. ही पोस्ट्स व्हायरल झाली आहे.
पती गाओ याने मानहानिचा खटला दाखल केला. कोर्टाने हे पतीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे ठरवले आणि नियू ना ला १५ दिवस सलग दररोज डौयिनवर सार्वजनिक माफीचा व्हिडीओ पोस्ट करण्याचे आदेश दिले (१२ जानेवारी २०२६ पासून सुरू, प्रत्येक व्हिडीओ कोर्टाच्या मंजुरीने). नियू ना ने आदेश पाळला, पण तिने व्यंग्यात्मक (sarcastic) पद्धतीने माफी मागितली, जसे:
“मी रागात होती आणि तुम्हाला अपमानित केल्याबद्दल खेद वाटतोय”
“मी तुम्हाला डुक्कर म्हणू नये, तुम्ही चांगले लीडर आणि प्रेमी आहात”
तिने व्हिडीओमध्ये पुरावेही शेअर केले. यामुळे तिचे फॉलोअर्स ३.५ लाखांवरून खूप वाढले. ती आता लाइव्ह स्ट्रीमिंग, गाव दाखवणे, पदार्थ विकून पैसे कमावतेय. लोक तिच्या बाजूने आहेत, पण तिच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे ती म्हणते. त्यांचे लग्न तुटले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण दोघे वेगळे राहतात. ही बातमी व्हायरल झाली कारण कोर्टाने अफेअर उघड करणाऱ्या महिलेलाच माफी मागायला भाग पाडले आणि तिच्या व्यंग्यपूर्ण माफीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे