एकनाथ शिंदेंच अस्तित्व संपवण्याची भाषा करणाऱ्या गणेश नाईक यांना शिंदेंच्या जवळच्या माणसांचं सणसणीत प्रत्युत्तर
"पक्षाने आता परवानगी दिली ना यांचं नामोनिशान साफ करून टाकू. हे आज मी परत बोलतोय, पण भारतीय जनता पक्ष शिस्तीचा आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. मनाला पटत नसताना हे कार्यकर्त्यांनी सहन केलं आहे"

वरिष्ठांनी परवानगी दिली तर शिंदेंच अस्तित्व संपवून टाकू असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं होतं. त्याला आता एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या माणसाने प्रत्युत्तर दिलं आहे. मागच्यावर्षी राज्य सरकार अस्तित्वात आल्यापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात मतभेद, कुरबुरी सुरुच आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हे मतभेद आणखी वाढले. नुकतीच गणेश नाईक यांनी शिंदेंच अस्तित्व संपवून टाकू अशी भाषा केली. त्याला शिंदेंच्या मंत्र्याने उत्तर दिलं आहे. “कुणी कितीही वल्गना केल्या तरी एकनाथ शिंदे समर्थ आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी तो भक्कम केला. बोलणं सोपं असतं, मात्र शिंदेंनी विधानसभा निवडणूक, नगरपरिषद निवडणुकीमध्ये करून दाखवलं. शिवसेना राज्यात नंबर दोनचा पक्ष आहे” असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. गणेश नाईकांच्या टीकेवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया.
“माझं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष एकटा लढला असता तर कल्याण आणि उल्हासनगर महापौर झाला असता. किल्ले कोणाचे नाहीत, भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना यांचं नामोनिशान साफ करून टाकू. हे आज मी परत बोलतोय, पण भारतीय जनता पक्ष शिस्तीचा आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. मनाला पटत नसताना हे कार्यकर्त्यांनी सहन केलं आहे” असं म्हणताना गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं.
त्यामुळे नवसाचा गणपती म्हणायला हरकत नाही
ठाण्यातील महागणपती मंडळाला गणेश नाईक यांनी काल भेट दिली. त्यावेळी गणेश नाईक बोलत होते. ‘सातत्याने मी तीन वर्षापासून या ठिकाणी येतोय. त्यामुळे नवसाचा गणपती म्हणायला हरकत नाही कारण याची फळ मिळायला लागली आहेत.’ महापौर पदावर बोलताना नाईक म्हणाले की, ‘मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या की ठाणे जिल्ह्यासह एमएमआरडीए परिसरामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्या लोकांना खासदारकी, आमदारकी असते. पण महापालिका आणि नगरपालिका ही कार्यकर्त्यांची असते. एकदा त्यांना लढू द्या लढल्यानंतर त्यांना पुन्हा ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा महापौर करू त्याला दुसऱ्या पक्षांनी पाठिंबा द्या. काही ठिकाणी दुर्देवाने ती संधी मिळाली नाही” असं गणेश नाईक म्हणाले.
