मोलकरणीवर लैंगिक अत्याचार… ‘धुरंधर’ फेम अभिनेत्याला अटक… गेल्या 10 वर्षांपासून…, धक्कादायक सत्य समोर
Dhurandhar: 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक... मोलकरणीवर लैंगिक अत्याचार... गेल्या 10 वर्षांपासून अभिनेता मोलकरणीसोबत... धक्कादायक प्रकरण कधी आणि कसं आलं समोर...? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा...

Dhurandhar: अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर’ सिनेमातील एक अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता नदीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. मोलकरणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे अभिनेत्यावर आरोप आहेत. मोलकरणीने गंभीर आरोप केल्यानंतर नदीम याला अटक करण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमात नदीम याने रेहमान डकैत याचा कूक अखलाक याची भूमिका साकारली. मोलकरीण महिलेने केलेल्या आरोपांनुसार, लग्नाचं खोटं आश्वासन देऊन अभिनेत्याने मोलकरणीचं दहा वर्षे लैंगिक शोषण केलं.
रिपोर्टनुसार, आरोप करणारी महिला 41 वर्षांची आहे आणि नदीम खानच्या घरी काम करण्यापूर्वी तिने इतर अनेक कलाकारांसाठी काम केलं होतं. सध्या या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे.
पीडीत महिलेने केलेले आरोप…
पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने म्हटले आहे की, 2015 मध्ये महिला अभिनेत्याच्या संपर्कात आली होती. पण वेळेनुसार, दोघांमधील संबंध घट्ट झाले आणि अभिनेत्याने महिलेला लग्न करण्याचं वचन दिलं. लग्नाचं वचन दिल्यानंतर, अभिनेत्याने अनेकदा महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता नदीम याने तब्बल 10 वर्ष महिलेसोबत संबंध ठेवले. पण त्यानंतर अभिनेत्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पोलिसांना मुंबई येथील वर्सोवा पोलीस स्थानकात अभिनेत्याविरेधात गुन्हा दाखल केला.
महिलेने आरोप केला आहे की, दोघे तिच्या घरी आणि वर्सोवा येथील नदीम खानच्या घरी भेटत असत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोघांमध्ये शारीरिक संबंध सर्वप्रथम पीडित महिलेच्या घरात ठेवण्यात आले. महिलेचं घर मालवानी पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात येतं. याच कारणामुळे वर्सोवा पोलिसांनी संबंधित प्रकरण मालवणी पोलिसांकडे वर्ग केले.’ आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिनेता नदीम खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. याआधी नदीम अभिनेत्री नीना गुप्ता आणि संजय शुक्ला यांच्या ‘वध’ सिनेमात देखील झळकला होता. याशिवाय अनेक जाहिरातींमध्ये देखील अभिनेत्याने काम केलं आहे
नदीम सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता त्याच्या कामाबद्दल चाहत्यांना सांगत असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
