बांगलादेशात 23 वर्षीय तरुणासोबत धक्कादायक प्रकार, हिंदूंमध्ये संतापाची, थेट गॅरेजला आग लावून..

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता धक्कादायक घटना पुढे आली असून मोठी खळबळ उडाली 23 वर्षी हिंदू मुलासोबत हैराण करणारा प्रकार घडला आहे.

बांगलादेशात 23 वर्षीय तरुणासोबत धक्कादायक प्रकार, हिंदूंमध्ये संतापाची, थेट गॅरेजला आग लावून..
Bangladesh
| Updated on: Jan 25, 2026 | 10:56 AM

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूवरील अत्याचार प्रचंड वाढली आहेत. भर रस्त्यांमध्ये हिंदू लोकांची हत्या केली जात आहे, त्यांची घरे जाळून टाकली जात आहेत. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक आहेत. राजकीय बदल बांगलादेशात झाली असून त्याचा तेथील परिस्थितीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशात निवडणुका आहेत, त्यापूर्वी मोठी हिंसा बांगलादेशात होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील भारतीय दूतावासावर दगडफेक झाली. हिंदू लोकांना जिवंत जाळण्याचे प्रकारे होत आहेत. बांगलादेशातील परिस्थितीवर भारताचे बारीक लक्ष आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा बांगलादेशात एका हिंदू तरूणाला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली, ज्याने मोठी खळबळ उडाली. चक्क गॅरेजमध्ये काम करणाऱ्या हिंदू युवकाला जिवंत जाळण्यात आले. ही या महिन्यातील पहिली घटना नसून अशा घटना सातत्याने घडत आहेत.

नरसिंदी पोलिस लाईन्सला लागून असलेल्या मस्जिद मार्केट परिसरात 23 वर्षीय हिंदू युवक चंचल चंद्र भौमिकची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतक चंचल चंद्र भौमिक हा कोमिल्ला जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी होता. ते अनेक वर्षांपासून नरसिंदी येथील एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याचा कोणासोबत वाद वगैरे काही नव्हता. तो आपल्या घरी देखील जात नसत. तो गॅरेजमध्येच राहत.

चंचलवर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती आणि तो एकटाच कमवणारा होता. मिळालेल्या माहितीनुसार, चंचल हा गॅरेजमध्ये झोपला होता. यावेळी गॅरेजचे शर्टर बाहेरून बंद करण्यात आले आणि गॅरेजच्या शर्टरवर पेट्रोल टाकून आग लावण्यात आली. काही वेळात आगीचा भडका उडाला. एक व्यक्ती गॅरेजला आग लावताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

आगीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. ही आग आटोक्यात आणण्यास तब्बल एक तास गेला. चंचल याने आगीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते. पोलिसांना चंचल याचा मृतदेह सापडला. ही आग चंचल याला मारण्यासाठीच लावल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर भारतात लोकांमध्ये संताप बघायला मिळत आहे.