AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुराच्या पाण्यात वाहून आली बँकेची तिजोरी, 29 जणांनी मिळून जे केले ते थक्क करणारे, तब्बल..

नेपाळमध्ये मोठा पूर आला. या पुराने थैमान घातले. लोकांना आपला जीव वाचवायलाही वेळ मिळाला नाही. स्थिती अत्यंत भयंकर होती. त्यातच आता माणुसकीला काळिंबा फासणारी घटना पुढे आली आहे.

पुराच्या पाण्यात वाहून आली बँकेची तिजोरी, 29 जणांनी मिळून जे केले ते थक्क करणारे, तब्बल..
Nepal bank locker
| Updated on: Aug 29, 2026 | 4:20 PM
Share

नेपाळमध्ये बुधवारी झालेल्या पूर आपत्तीमधील मृतांची संख्या आता 600 च्या वर गेली. त्यामध्येच 2000 लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. नेपाळमधील अंगावर काटा आणणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट होते की, नेपाळमध्ये परिस्थिती किती जास्त भयंकर आणि खतरनाक होती. नेपाळमध्ये अनेक देशांचे पर्यटक अडकली आहेत. भारतातील पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. भारतीय पर्यटकांना सुरक्षित काढण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. काही जणांचा अजूनही संपर्क होऊ शकला नाही. नेपाळमध्ये आलेल्या पुराने सर्वकाही संपले. भारताने नेपाळला तात्काळ मदत पुरवली. 10 टन मदत भारतीय सैन्याच्या विमानाने नेपाळमध्ये पाठवण्यात आली. यासोबतच बचावकार्यात मदत करण्याचा प्रस्तावही भारताने नेपाळला दिला होता.

नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला. बचावकार्य राबवले जात आहे. मात्र, यादरम्यानच माणुसकीला काळींबा फासणारी घटना नुकताच पुढे आली. रसुवा परिसरात भोटेकोशी नदीच्या पुराच्या पाण्यात त्रिशूली नदीत एका बँकेचे लॉकर वाहून आले. हे लॉकर धादिंग जिल्हातील गल्छी गावातील बेलखूखोलाजवळ आले. 29 लोकांनी मिळून हे लॉकर फोडले आणि थेट त्यातील पैसे लुटले.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली की, स्थानिक लोकांनी बँकेचे लॉकर फोडले आहे आणि पैसे काढली जात आहेत. सूचना मिळताच नेपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारीही केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 29 लोकांना अटक केले. त्यांच्याकडून 92,68,505 नेपाळी रूपये जप्त केले. पोलिसांच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले जास्त करून लोक हे गल्छीच्या मास्टर गावचे रहिवासी आहेत.

नेपाळमध्ये मोठा हाहाकार निसर्गाचा बघायला मिळाला. अनेक लोकांच्या घरातील सदस्य अजूनही बेपत्ता आहेत. कुटुंब दूर गेले. आपल्या जवळच्या लोकांना पुराच्या पाण्यात वाहताना लोकांनी बघितले पण वाचू शकले नाही. फक्त नेपाळी लोकच नाही तर 517 विदेशी नागरिकही बेपत्ता आहेत. नेपाळला विदेशातून मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे. अमेरिकेनेही नेपाळला हवी ती प्रत्येक मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी