अमेरिकेच्या दबावात भारताची रशियाकडून तेल खरेदी कमी?, जगाची झोप उडवणारा अहवाल पुढे, डोनाल्ड ट्रम्प..

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत. रशियाला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक प्रयत्न ही त्यांच्याकडून केली जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा रस सध्या जगातील युद्ध रोखण्यामध्ये अधिक वाढला आहे.

अमेरिकेच्या दबावात भारताची रशियाकडून तेल खरेदी कमी?, जगाची झोप उडवणारा अहवाल पुढे, डोनाल्ड ट्रम्प..
India Russia oil
| Updated on: Oct 15, 2025 | 8:02 AM

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला. चीनने दुर्मिळ खनिजांवर निर्बंध लादल्याने 100 टक्के टॅरिफ लावल्याचे अमेरिकेने सांगितले. वेगवेगळी कारणे देऊन अमेरिका टॅरिफ लावत आहे. भारत-चीनने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये, याकरिता दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. अमेरिकेच्या दबावानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. मात्र, सध्या काही धक्कादायक असे आकडे पुढे येताना दिसत आहेत. नुकताच आलेल्या आकड्यांनुसार, भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याने एकच खळबळ उडाली. सध्या सणवार असल्याने तेलाची मागणी जास्त आहे. भारत हा अमेरिकेच्या दबावाखाली येऊन तर तेल खरेदी कमी करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता धमक्या देत असतानाच तेल खरेदीची संपूर्ण आकडेवारी पुढे आली. मागील आठ महिन्यात दरवेळीच्या तुलनेत 10 टक्के रशियन तेलाची आयात कमी झालीये. कमोडिटी टॅकर केपलरच्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर 2025 पर्यंत 4.5 मिलियन बॅरल प्रत्येक दिवशी कच्चे तेल आयात झाले. 1.6 मिलियन बॅरल प्रत्येक दिवशी रशियाकडून आले म्हणजेच 34 टक्के. दरमहिन्यात रशियाच्या तेलाच्या किंमती कमी होताना बघायला मिळत आहे.

युक्रेनने हल्ल्यामध्ये रशियाच्या तेलाच्या प्रकल्पांना टार्गेट करत हल्ला केला. ज्यामध्ये रशियाच्या प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. मात्र, तरीही भारताला कच्चे तेल निर्यात रशियाने सुरूच ठेवले आहे. भारत रशियाकडून खरेदी केलेले कच्चे तेल रिफायनरी करतो आणि इतर देशात त्याची विक्री होते. हीच मोटी पोटदुखी अमेरिकेची आहे.

अहवालानुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये तेल आयात सुमारे 70,000 बॅरलने वाढली, परंतु गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हा आकडा जवळजवळ स्थिर राहिला. ऑक्टोबरमध्ये भारताची एकूण कच्च्या तेलाची आयात सरासरी 1.6 दशलक्ष बॅरल प्रत्येक दिवशी राहिली. मात्रर, रशियन तेल पुरवठा सरासरी 1.8 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतका कमी झाला. ही एकप्रकारे हैराण करणारी आकडेवारी नक्कीच म्हणावी लागेल.