जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराबद्दल धक्कादायक माहिती, थेट तो..

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. वॉशिंग्टन डीसीच्या हॉटेलमध्ये खास जेवणाची मेजवाणी व्हाईट हाऊसकडून ठेवण्यात आली होती. अख्खे कॅबिनेट याकरिता उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प उपस्थित लोकांना संबोधित करत असताना मोठा आवाज झाला. आता या प्रकरणाबद्दल धक्कादायक माहिती पुढे आलीये.

जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराबद्दल धक्कादायक माहिती, थेट तो..
Donald Trump event attacker
| Updated on: Apr 26, 2026 | 11:34 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेचे काही व्हिडीओही पुढे आली. खास जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन व्हाईट हाऊसकडून करण्यात आले होते. मात्र, सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना हॉटेलमध्ये गोळीबार झाला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि ट्रम्प यांचे अख्ख्ये कॅबिनेट उपस्थित होते. गोळीबाराच्या घटनेदरम्यान उपस्थितांनी स्वत:चा जीव वाचवत टेबलखाली लपून बसले. स्फोटाचा मोठा आवाज येत असताना सुरक्षारक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे धाव घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात अगोदर टेबलखाली लपवण्यात आले आणि एक कवच करून त्यांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले. मात्र, या घटनेने जगात एकच खळबळ उडाली. या हल्ल्याची अधिकची चाैकशी सुरू आहे.

हल्लेखोराला ठार करण्यात जवानांना यश मिळाले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे सांगितले जात आहे. एजन्सीकडून या हल्ल्याबाबत चाैकशी केली जात आहे. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी हल्लेखोराला जमिनीवर दाबून धरले. या हल्ल्यात एक एजंट जखमी झाला. बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचा जीव वाचला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

आता हल्लेखोराबद्दल धक्कादायक माहिती मिळत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हल्लेखोराची ओळख कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील 31 वर्षीय शिक्षक कोल ॲलन म्हणून पटली आहे. धक्कादायक म्हणजे हा हल्लेखोर एक शिक्षक आहे. ही घटना शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. कार्यक्रमाच्या मुख्य सुरक्षा तपासणी जवळ त्याची चाैकशी  केली जात होती. यावेळीच त्याने गोळीबाराला सुरूवात केली.

एका केंद्रीय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या सूत्राने त्याच्या ओळखीची पुष्टी केली आहे. मात्र, त्याने हा हल्ला नक्की कोणत्या कारणाने केला, याबाबत माहिती मिळू शकली नाहीये. या गोळीबाराबद्दल वॉशिंग्टन डीसीच्या पोलिसांनी मोठा खुलासा केला. पोलीस प्रमुख जेफ्री कॅरोल यांनी सांगितले की, संशयित त्याच हॉटेलमध्ये राहत होता, ज्यामुळे त्याला कार्यक्रमादरम्यान आत प्रवेश करणे सोपे झाले.

Follow Us