AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, भारताची मोठी प्रतिक्रिया, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी..

डोनाल्ड ट्रम्प एका कार्यक्रमाला पोहोचले होते. विशेष म्हणजे व्हाईट हाऊसकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी धक्कादायक घटना घडली. थेट मोठा गोळीबार झाला. या घटनेचे काही व्हिडीओही पुढे आली आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, भारताची मोठी प्रतिक्रिया, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी..
Donald Trump and Prime Minister Narendra Modi
| Updated on: Apr 26, 2026 | 11:06 AM
Share

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरचे आयोजन करण्यात आले. याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटमधील जवळपास सदस्य उपस्थित होते. सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. डोनाल्ड ट्रम्प उपस्थित लोकांना संबोधित करत होते. मात्र, यावेळी स्फोटाचा आवाज आला. धाडधाड गोळ्या झाडल्या जात होत्या. क्षणाचाही विचार न करता सिक्रेट सर्विस आणि सुरक्षारक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना घेरा घातला. उपस्थित लोक टेबलखाली लपून बसले. काही क्षणात पार्टीचे वातावरण भीतीमध्ये बदलले. यादरम्यानचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याचेही सांगितले जात आहे. हल्लेखोराला एक सुरक्षारक्षकांना रोखले असता त्याने थेट गोळीबार सुरू केल्याचे कळते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेटपणे हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. या घटनेनंतर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. या घटनेचा निःसंदिग्धपणे निषेध केला पाहिजे.

वॉशिंग्टन डिसीतील गोळीबारानंतर जगातील अनेक देशांनी याचा निषेध नोंदवला. डोनाल्ड ट्रम्प यांनीही गोळीबाराच्या घटनेनंतर सर्वजण सुरक्षित असल्याचे म्हटले. हेच नाही तर अशा घटनांची सवय असल्याचेही त्यांनी म्हटले. सिक्रेट सर्विस आणि एजन्सीमुळे आपण सुरक्षित असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी सिक्रेट सर्विस आणि एजन्सीचे धन्यवाद मानले.

खास पार्टीचे या हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले होते. विशिष्ट लोकांना आमंत्रित करण्यात आले. मात्र, अचानक गोळीबाराला सुरूवात झाली. सुरूवातीला सिक्रेट सर्विसच्या जवानांनी डोनाल्ड ट्रम्प यांना टेबल खाली लपवले आणि एक मोठे मानवी कवच निर्माण करून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या गोळीबाराचा घटनेने एकच मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह सर्वजण सुरक्षित आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल