
इराणमधील सॅटलाईट फोटो पुढे आली आहेत, ज्याने संपूर्ण जगाची झोप उडाली. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मात्र, इराणनेही स्पष्ट शब्दात सांगितले की, आमच्यावर हल्ला करणाऱ्याचे आम्ही हात तोडू शिवाय संपूर्ण जगालाही याची किंमत मोजावी लागेल. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इराणमध्ये परिस्थिती अशी होती की, कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. मात्र, इराणची आक्रमकता पाहून अमेरिकेने एक पाऊस मागे घेतले. गेल्या वर्षी इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या भयंकर हवाई हल्ल्यांनंतर इराणच्या अणुस्थळांवर पुन्हा एकदा हालचाली दिसून येत आहेत. ज्याने जगाचे टेन्शन वाढले. इराणच्या डोक्यात काहीतरी खतरनाक सुरू असल्याचे यावरून दिसत आहे. सॅटलाईटपासून या गोष्टी दूर राहाव्यात, याकरिता छत टाकण्याचे काम देखील सुरू आहे.
नुकताच मिळालेल्या सॅटलाईट फोटोंनुसार, इराणने त्यांच्या दोन प्रमुख अणुस्थळांवर इस्फहान आणि नतान्झ येथे खराब झालेल्या संरचनांवर नवीन छत टाकण्याचे काम सुरू केले. यामुळे आतमध्ये नक्की काय घडतंय, यावरून खळबळ उडाली. प्लॅनेट लॅब्स पीबीसीने प्रसिद्ध केलेल्या सॅटलाईट फोटोंनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भीती अधिकच वाढल्याचे चित्र आहे. तेहरानकडून हल्ल्यांनंतर राहिलेली संवेदनशील अणुसंपत्ती लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अंदाज आहे.
शिवाय ही अणुशक्ती परत मिळवण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असावा, असा अंदाज आहे. इराणकडून अणुस्थळांवर छत टाकण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. यामुळे सॅटलाईटलाच्या माध्यमातूनही आत नक्की काय सुरू आहे हे कळत नाही. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) निरीक्षकांना देशात प्रवेश करण्यास परवानगी दिलेली नाही.
ज्यामुळे आता इराणमध्ये नक्की काय सुरू आहे हे फक्त सॅटलाईटच्या माध्यमातून बघितले जाऊ शकते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, या छतांचा उद्देश कोणत्याही नवीन अणु बांधकामापेक्षा ढिगाऱ्याखाली असलेली संवेदनशील उपकरणे आणि युरेनियम साठे जगाचे लक्ष वेधून घेणे आहे. इराणला आता हे बघायचे आहे की, इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर नक्की काय काय वाचले. मात्र, इराणमधून आलेले हे सॅटलाईट फोटो हादरवणारी आहेत.