
एका नर्सिंग होमने एक व्हिडीओ शेअर केल्यामुळे मोठा वाद निर्माण केला आहे. या व्हिडीओमध्ये एक वरिष्ठ कर्मचारी वृद्ध रहिवाशांसमोर अश्लील नृत्य करताना दिसत आहे. असे म्हटले जाते की, हे नृत्य त्यांना औषध घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने केले गेले होते. या नर्सिंग होमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा परसला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत तक्रार केली आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, हा व्हिडिओ 24 सप्टेंबर रोजी उत्तर चीनमधील हेनान प्रांतातील आन्यांग येथील संस्थेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला लहान, शालेय गणवेशासारखे कपडे आणि गुडघ्यापर्यंत काळे मोजे घालून, समोर बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीसमोर अश्लील नृत्य करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आमचे संचालक वृद्ध रुग्णांना औषध घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.” व्हिडीओच्या मध्यभागी, एक दुसरा कर्मचारी वृद्ध व्यक्तीला औषध देण्यासाठी त्यांच्याकडे जातो.
वाचा: हिचे क्लिवेज बघ किती डिप; गायिकेने सांगितला पुण्यातल्या बालरोगतज्ज्ञासोबतचा वाईट अनुभव
एससीएमपीच्या मते, नर्सिंग होमच्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये स्वतःचे “90 च्या दशकातील पहिल्या संचालकाद्वारे संचालित आनंदी वृद्धाश्रम” असे वर्णन केले आहे, जे वृद्धांना आनंद देण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. त्यांचे घोषित ध्येय आहे “वृद्धापकाळात जीवनाची गुणवत्ता सुधारणे.” व्हिडीओ शेअर केल्यानंतर लगेचच चीनी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. यामध्ये अशा दृष्टिकोनाच्या नैतिकता आणि सन्मानावर टीका करण्यात आली. एका नेटिझनने कमेंट करत, “आता वृद्धाश्रमांमध्येही अश्लील नृत्याचा ट्रेंड सुरू झाला आहे का?” असा प्रश्न विचारला आहे
विरोधानंतर व्हिडीओ हटवले
25 सप्टेंबर रोजी, नर्सिंग होमच्या संचालकाने नांगुओ मेट्रोपोलिस डेलीला सांगितले की, व्हिडीओमध्ये दिसणारी महिला वृद्धाश्रमात काळजी घेणारी कर्मचारी आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, व्हिडीओमधील महिला व्यावसायिक नर्तकी नाही आणि सामान्यतः पत्त्यांचे खेळ आणि गायन यांसारख्या पारंपरिक गतिविधीच आयोजित केल्या जातात. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, या नृत्याचा उद्देश नर्सिंग होममधील निराश आणि हताश वृद्धांच्या जीवनात आनंज आणण्याचा आहे. त्यांना हे दाखवायचे होते की वृद्धाश्रम जीवंत असू शकतात, परंतु त्यांनी कबूल केले की या दृष्टिकोनाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. जनतेच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर, नर्सिंग होमने 100 हून अधिक संबंधित व्हिडीओ हटवले आहेत.