
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची हत्या झाल्याच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत, मात्र आता या सर्व अफवा असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान त्यानंतर इमरान खान यांच्या बहीण अलिमा खान यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. आम्हाला इमरान खान यांना भेटू दिलं जात नाहीये, तसंच आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाहीये, इमरान खान यांच्या पक्षातील लोक त्यांना ज्या जेलमध्ये ठेवलं आहे, तिथे गेले होते, त्यांची बैठक देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. मात्र जेल प्रशासनाने त्यांना आत जाऊच दिलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, गेल्या चार आठवड्यापासून माझ्यासह कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीला इमरान खान यांना भेटू दिलं जात नाहीये. इमरान खान यांची जेलमध्ये हत्या करण्यात आली, अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी चालवली, माहीत नाही त्यांना अशी माहिती कुठून मिळाली? असं इमरान खान यांची बहीण अलीमा खान यांनी म्हटलं आहे, त्यांनी पुढे बोलताना पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप केला आहे की, पोलिसांना थेट आदेश देण्यात आले आहेत की, इमरान खान यांना ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे, त्या जेल परिसरात जर पीटीआयचे कार्यकर्ते जमले किंवा इमरान खान यांचे समर्थक जमले तर त्यांच्यावर लाठीचार्ज करा अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत, असा आरोपही यावेळी इमरान खान यांच्या बहिनेने केला आहे.
त्यामुळे पोलीस तिथे जे लोक जमतील त्यांच्यावर थेट हल्ला करत आहेत, त्यांना मारहाण करत आहेत. ते लहान मुलं महिला, वृद्ध व्यक्ती असं काहीच पहात नाहीत, सरकारचा असा प्लॅन आहे की, इमरान यांना देश सोडून जाण्यासाठी मजबूर करायचं. मात्र इमरान देश सोडणार नाहीत, कारण त्यांना देशभरातून प्रचंड समर्थन मिळत आहे. पाकिस्तानमध्ये जेव्हा मोठं आंदोलन झालं होतं, तेव्हा सरकारने अनेक आंदोलकांना गोळ्या घातल्या होत्या. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. ही संख्या एवढी होती की मोजता देखील येणार नाही. त्यांनी मृतदेह लपवले, जखमी लोकांना देखील लपवलं.आता हे आंदोलन पाकिस्तान सरकारच्या कंट्रोलमध्ये राहिलेलं नाही. त्यांना वाटतं की इमरान खान यांनी माफी मागवी आणि पाकिस्तान सोडावा, पण इमरान खान पाकिस्तान सोडणार नाही, कारण ज्यांनी मागे पाकिस्तान सोडला ते सर्व प्रशासक होते, मात्र इमरान खान हे लीडर आहेत, असं यावेळी अलीमा खान यांनी म्हटलं आहे.