स्फोटानंतर श्रीलंकन आर्मी अॅक्शनमध्ये, 15 संशयितांचा खात्मा

कोलंबो : साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन आर्मीने धरपकड करत मोठी कारवाई केली आहे. श्रीलंकन जवानांनी तब्बल 15 सशंयित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे आयसिस या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत सर्च ऑपरेशनमध्ये जवानांनी 75 पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. श्रीलंकेत गेल्या रविवारी झालेल्या स्फोटात जवळपास 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये […]

स्फोटानंतर श्रीलंकन आर्मी अॅक्शनमध्ये, 15 संशयितांचा खात्मा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

कोलंबो : साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकन आर्मीने धरपकड करत मोठी कारवाई केली आहे. श्रीलंकन जवानांनी तब्बल 15 सशंयित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे आयसिस या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत सर्च ऑपरेशनमध्ये जवानांनी 75 पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. श्रीलंकेत गेल्या रविवारी झालेल्या स्फोटात जवळपास 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता.

गेल्या रविवारी झालेल्या साखळी स्फोटानंतर श्रीलंकन जवानांनी मॅरेथॉन सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी पूर्वेकडील प्रांतात काही ठिकाणी छापेमारी केली. यावेळी एका संशयिताने स्वत:ला बॉम्बने उडवून दिलं. शिवाय त्याच्या सहकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत 15 संशयितांना जवानांनी कंठस्नान घातलं.     जे संशयित ठार झाले त्यांच्याकडे हत्यारांचा मोठा साठा होता, असं सांगण्यात येत आहे.

VIDEO : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा महाभयंकर व्हिडीओ समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोलंबोपासून 325 किमी दूर सम्मनतुरई शहरात गोळीबारादरम्यान, एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोट करुन, स्वत:ला उडवून घेतलं. सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात 15  शस्त्रधारी संशयितांचा खात्मा झाला. या चकमकीनंतर स्फोटकांचा मोठा साठा, एक ड्रोन आणि आयसिसचा लोगो असलेलं बॅनर मिळालं”

वाचा – श्रीलंका बॉम्बस्फोट चौकशीदरम्यान महिलेने स्वतःसह मुलांना बॉम्बने उडवले 

भीषण साखळी स्फोटानंतर श्रीलंकेतील नागरिक हादरुन गेले आहेत.  श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितलं की, आयसिसशी संबंधित स्थानिक दहशतवादी संघटनांचा उपद्रव वाढत आहे. त्यासाठी नव्या कायद्याची गरज आहे. सध्याचे कायदे अंतर्गत दहशतवाद्यांना शासन करण्याच्या दृष्टीने कडक नाहीत, असं पंतप्रधान विक्रमसिंघे यांचं म्हणणं आहे.

श्रीलंकेत साखळी स्फोट

श्रीलंकेत 21 एप्रिलला भीषण साखळी स्फोट झाले. ईस्टर संडेच्या मुहूर्तावर ख्रिश्चन नागरिकांना लक्ष्य करुन हे स्फोट घडवण्यात आले. विविध ठिकाणी 8 पेक्षा जास्त बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये जवळपास 359  नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये 10 भारतीय आणि 39 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर त्यापेक्षा अधिक लोक जखमी झाले. हा हल्ला आयसिसने केल्याचा संशय आहे.  या घटनेनंतर पोलिसांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी बॉम्बस्फोट करणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून आतापर्यंत 75 संशयितांनाअटक केली. बॉम्बस्फोटात समावेश असणाऱ्या अनेकांची ओळख पटलेली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

संबंधित बातम्या 

श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट  

दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्याची शक्यता  

VIDEO : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा महाभयंकर व्हिडीओ समोर  

श्रीलंका बॉम्बस्फोट चौकशीदरम्यान महिलेने स्वतःसह मुलांना बॉम्बने उडवले  

श्रीलंका बॉम्बस्फोटात डेन्मार्कच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या 3 मुलांचा मृत्यू   

श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू   

बॉम्बस्फोटानं श्रीलंका हादरली, जवळपास 200 जणांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.