श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट

कोलंबो : श्रीलंकेमध्ये आज (25 एप्रिल) पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. बॉम्ब हल्ला झाल्याचा आवाज तेथील स्थानिकांनी ऐकला. हा बॉम्बस्फोट राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अतंरावर पुगोडानगर येथे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी (21 एप्रिल) सलग आठ ठिकाणी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये तब्बल 359 लोकांना आपला प्राण गमवावा लागला. श्रीलंकेत रविवारी …

श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट

कोलंबो : श्रीलंकेमध्ये आज (25 एप्रिल) पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. बॉम्ब हल्ला झाल्याचा आवाज तेथील स्थानिकांनी ऐकला. हा बॉम्बस्फोट राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अतंरावर पुगोडानगर येथे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी (21 एप्रिल) सलग आठ ठिकाणी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये तब्बल 359 लोकांना आपला प्राण गमवावा लागला.

श्रीलंकेत रविवारी चर्च आणि हॉटेलमध्ये हे बॉम्बस्फोट झाले. या झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 भारतीय आणि 39 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली असून आतापर्यंत 60 संशयीत लोकांना अटक केली. बॉम्बस्फोटात समावेश असणाऱ्या अनेकांची ओळख पटलेली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

“बॉम्बस्फोट करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या स्थानिक मुस्लीम संघटनेच्या प्रमुखाने संग्रिला हॉटेलमध्ये स्वत:ला आत्मघाती बॉम्ब हल्ल्यामध्ये उडवून दिले”, असं उप संरक्षण मंत्री म्हणाले.

बॉम्बस्फोटाने श्रीलंका देश हादरुन गेला. तिथे सध्या पोलीस बॉम्बस्फोट करणाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. स्थानिक मीडियाकडून अनेक व्हिडीओ सादर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये रविवारी आत्मघातकी हल्लेखोर वेग-वेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवताना दिसत आहेत. मंगळवारी एक व्हिडीओ समोर आला, या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्फोटकांनी भरलेली बॅग चर्चमध्ये घालून जाताना दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *