AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडी बंद, भारतावर गंभीर परिणाम, पेट्रोल- डिझेल महागणार?, CTI ने वाढवले टेन्शन..

इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात आहे. अमेरिकेने इराणवर सुरू केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे संकट उभे आहे. त्यामध्येच आता मोठा इशारा देण्यात आला.

होर्मुज खाडी बंद, भारतावर गंभीर परिणाम, पेट्रोल- डिझेल महागणार?, CTI ने वाढवले टेन्शन..
Petrol-Diesel
| Updated on: Jun 11, 2026 | 12:48 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. होर्मुज जवळ इराणने आपले हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला. त्यानंतर अमेरिकेने मोठे हवाई हल्ले इराणवर केले. गेल्या दोन दिवसांपासून इराणवर मोठे हल्ले सुरू आहेत. इराणचे प्रमुख शहर अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. आम्ही अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा खोटा असल्याचे सांगत इराणने म्हटले की, आम्ही काहीही झाले तरीही हार मानणार नाहीत. अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी इराणने थेट होर्मुज खाडी बंद करण्याचा निर्णय घेतला. आता होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे. होर्मुज खाडीतून एकही जहाज येऊ शकत नाही. इराणने म्हटले की, जर कोणी होर्मुज खाडी पार करण्याची हिंमत केली तर थेट उडवून दिले जाईल. आता जगाची चिंता वाढली असून होर्मुज खाडी पूर्णपणे बंद आहे.

होर्मुज खाडी पूर्णपणे बंद असणे ही भारतासाठी अत्यंत मोठी धोक्याची घंटा आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे जंग अस्थिरतेच्या संकटात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दिलेल्या धमक्यांमुळे चिंता वाढली. या परिस्थितीबाबत भारतातील प्रमुख व्यापार आणि उद्योग संघटना असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने चिंता व्यक्त केली आहे. कारण याचा घातक परिणाम थेट भारतावर होईल.

CTI चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी एक निवदेन जारी केले. त्यात त्यांनी म्हटले की, 20 टक्के तेल याच मार्गाने येते. जर होर्मुज खाडी काही काळ बंद राहिली तर 1970 नंतरचे सर्वात मोठे ऊर्जा संकट येऊ शकते. पेट्रोल व डिझेलसह तेलाच्या किमतीत अचानक मोठी वाढ होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी कधीच पूर्णपणे बंद नव्हती. इराण थोड्या कमी प्रमाणात पण जहाजांना सुरक्षित मार्ग देत होता. आता होर्मुज खाडी इराणकडून पूर्णपणे बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने फक्त भारतच नाही तर जग संकटात आहे. अमेरिकेच्या मोठे हल्ले करत असतानाच इराणकडून थेट होर्मुज खाडीत बंद करण्यात आली. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सतत वाढत आहे.

Follow Us
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय