
अफगान प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येचा धक्कादायक दावा केला आहे. इमरान यांच्या कुटुंबियांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांना भेटू दिले जात नाही अशा वातावरणात ही बातमी आली आहे. त्यांच्या बहिणी अलीमा, उज्मा आणि नोरिन यांनी वारंवार अदियाला तुरुंगात जाण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रत्येक वेळी त्यांना गेटवरच अडवण्यात आले.
इमरान यांच्या संदर्भात इतके संशयाचे वातावरण आहे की इमरान समर्थक जेलच्या बाहेर जोरदार निदर्शने करत आहेत. पाकच्या सरकार काही सांगत नाहीए, ना जेल प्रशासन, तसेच दोन आठवड्यांपासून इमरान खान यांचा कोणताही अधिकृत छायाचित्र जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे पाच असे संकेत पाहूयात ज्यामुळे इमरान खान यांच्या सोबत काही बरेवाईट झाल्याची शक्यता वाटत आहे. त्यांच्या मृत्यूसंदर्भात टीव्ही 9 मराठी या संदर्भात कोणताही दावा करीत नाही.
मार्च 2025 मध्ये PIMS हॉस्पिटलच्या मेडीकल टीमने त्यांची तपासणी केली होती. परंतू PTI या त्यांच्या पक्षाने हे मेडीकल चेकअप केवळ देखावा होता असे म्हटले आहे. त्यानंतर कोणत्याही विश्वासार्ह डॉक्टरांनी त्यांची तपासणी करु दिली नाही. मात्र, कोर्टाने स्पष्ट आदेश दिले होते, त्यांना आठवड्यातून दोनदा कुटुंबाला भेटू द्यावे,वकील आणि मित्रांना भेटू द्यावे. त्यांच्या स्थितीवरुन अनेक गंभीर प्रश्न निर्माण केल जात आहेत.
इस्लामाबाद हायकोर्टाने मार्चमध्ये आदेश दिले होते की इमरान यांना त्यांच्या वकीलांना भेटू दिले जावे. परंतू गेल्या महिन्यांपासून वकीलांचा प्रवेश पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे इमरान यांचा पक्ष PTI ने केलेल्या आरोपात तथ्य वाटत आहे की इमरान यांची स्थिती लपवली जात आहे.
इमरान खान यांच्या बहिणी अलीमा खान, नूरीन खान आणि उझमा खान यांना वारंवार गेटवर अडवले जात आहे. 25 नोव्हेंबरच्या रात्री तिन्ही बहिणींनी जेलच्या बाहेर शेकडो समर्थकांसह निदर्शने केली. त्यांचा आरोप आहे की इमरान यांच्यासंदर्भात काहीतरी वाईट झाले आहे. इमरानची बहिण नुरीन खान हीने पंजाब पोलिसांना संघटीत हल्ला करण्याचा आरोप केला आहे.त्यांनी म्हटले आहे की कोणतीही सूचना न देता स्ट्रीट लाईट बंद केली आणि पोलिसांनी आमच्यावर हल्ला केला.
नुरीन खान या 71 वर्षांच्या आहे. त्यांनी असा दावा केला आहे की पोलिसांनी त्यांचे केस पकडून त्यांना जमीनीवर पाडले आणि घसटत नेले. अन्य महिलांसोबतबी धक्का-बुक्की आणि मारहाण केल्याची माहिती उघड होत आहे. त्यांनी पंजाब IGP ना या हिंसेत सामील पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
इमरान खान यांना एकतर कोणत्यातरी गुप्त ठिकाणी हलवले आहे किंवा त्यांना नजरकैदेत एकांतवासात डांबले आहे असा दावा पीटीआयच्या नेत्यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षात त्यांचे तुरुंगातील अधिकृत फोटो आणि अपडेट मिळत होते. परंतू असे पहिल्यांदाच झाले आहे की गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांची कोणतीही माहिती बाहेर आलेली नसल्याने संशय वाढला आहे.
इमरान खान यांच्या रहस्यमय स्थितीमुळे पाकिस्तानचे सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अचानक एक उच्च स्तरिय आपात्कालिन सुरक्षा बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयएसआय, मिलिट्री इंटेलिजन्स आणि गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचा एजेंडा सार्वजनिक केला गेलेला नाही. त्यामुळे असा कयास केला जात आहे की पाकिस्तानचे सरकार आणि सैन्य यांच्या काहीतरी मोठा डाव होणार असल्याचे म्हटले जात आहे.