
जगात असे अनेक शहर आहेत जेथे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे सुरक्षेसाठी ते उत्तम देश मानले जातात. परंतू तुम्हाला हे माहीती आहे का ? एक असे शहर आहे जेथे जवळपास प्रत्येकाकडे बंदूक आहे. आणि घरातून बाहेर पडताना बंदूक बाहेर घेऊन पडावे लागते. आश्चर्याची बाब म्हणजे येथे क्राईम नसल्यात जमा आहे. तरीही हत्यार जवळ बाळगणे सर्वसामान्य बाब आहे. यामागचे कारण मोठे आश्चर्यकारक आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार आर्टीक्टच्या इन्फ्लुएंसर सेसिलिया ब्लोमडाहल नॉर्वे येथील बर्फाळ बेट स्वालबार्ड येथे रहातात. त्यांनी सांगितले की येथे घराच्या बाहेर पडताना बंदूक जवळ बाळगावी लागते. त्याच नाहीत तर येथे बहुतांश लोक रायफल किंवा बंदूक जवळ सुरक्षेसाठी
बाळगतात. याचे कारण म्हणजे येथे पोलर बिअर ( पांढरे अस्वल ) यांची संख्या मोठी आहे. ते कधीही अचानक तुमच्या समोर येऊ शकतात.
ब्लोमडाहल यांनी सांगितले की पोलर बिअरसाठी हत्यार बाळगणे गरजेचे असते.तरीही त्यांना नऊ वर्षात कधी रायफलचा वापर करण्याची वेळ आली नाही. परंतू जंगलात मोकळ्या जागी फिरताना रायफल वा फ्लेअर गन सोबत बाळगणे मजबूरी आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की बंदूकीचा वापर केवल जीवाला धोका होण्याच्या स्थितीच केला जातो.
स्वालबार्ड प्रशासनाच्या नियमांनुसार शहराच्या आत लोडेड बंदूक घेऊन फिरण्यास बंदी आहे. दुकानं आणि सार्वजनिक इमारतीत शस्र घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. बंदूक बाळगणे कायद्याने अनिवार्य नाही. परंतू धोक्यापासून वाचण्यासाठी हा सल्ला दिला जातो. बंदूक घेण्यासाठी गर्व्हनरच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण करावी लागते.
स्वालबार्ड हे जगातील सर्वात सुरक्षित स्थानांपैकी एक आहे. येथे कायम स्वरपी घरे नाहीत आणि गुन्ह्याच्या घटना सामान्य नाहीत. या शहराची भौगोलिक स्थिती भूकंप आणि अन्य नैसर्गिक संकटात या शहरास सुरक्षित राखते. ही जाग केवळ सुंदर नसून सुरक्षा आणि अनोख्या जीवनशैलीचे देखील एक अदभूत उदाहरण मानले जाते.