Taliban: तालिबानची क्रूरता पुन्हा आली समोर, 20 महिलांसह 114 जणांना भरचौकात…

अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हातात गेल्यापासून देशात शरिया कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे या देशात छोट्या चुकांसाठीही अमानवीय शिक्षा दिली जाते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Taliban: तालिबानची क्रूरता पुन्हा आली समोर, 20 महिलांसह 114 जणांना भरचौकात...
Taliban Punishment
| Updated on: Sep 23, 2025 | 3:37 PM

अफगाणिस्तानची सत्ता तालिबानच्या हातात गेल्यापासून देशात शरिया कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे या देशात छोट्या चुकांसाठीही अमानवीय शिक्षा दिली जाते. अनेक मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्रांनी विरोध केल्यानंतरतही तालिबानने अशा शिक्षा सुरूच ठेवल्या आहेत. अशातच आता अमू न्यूजने एक अहवाल सादर केला आहे, यानुसार गेल्या महिन्यात तालिबानने देशभरात सार्वजनिकरित्या 114 लोकांना चाबकाचे फटके मारल्याचे समोर आले आहे. यात 20 महिलांचाही समावेश होता अशी माहितीही समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर या एका महिन्याच्या काळात सुनबुलामध्ये बऱ्याच महिलांना चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. सुनबुलामध्ये अशा शिक्षेची संख्या जवळजवळ पाच पटीने वाढली आहे, गेल्या महिन्यात 10 लोकांना सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारण्यात आले होते, मात्र या महिन्यात ही संख्या 50 झाली आहे.

लोकांना चाबकाचे फटके का मारण्यात आले?

समोर आलेल्या माहितीनुसार तालिबानने 15 प्रांतांमध्ये अशाप्रकारची शिक्षा दिली आहे. यातील काबूल, परवान आणि तखारमध्ये सर्वात जास्त लोकांना शिक्षा देण्यात आली आहे. तसेच घोर, लोगार, बल्ख, लगमान, तखर, बदख्शान, जोव्झान आणि बागलान या भागातील काही महिला घरातून पळून गेल्या होत्या त्यामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली होती. तसेच काही महिलांवर भ्रष्टाचाराचा आरोप होता, त्या महिलांनाही सार्वजनिक ठिकाणी शिक्षा देण्यात आली आहे.

अनेकांचा तालिबानी शिक्षेला विरोध

अफगाणिस्तानमध्ये दिल्या जाणाऱ्या या तालिबानी शिक्षेला जगभरातून विरोध होत आहे. अनेक मानवी हक्क कार्यकर्त्यांनी शारीरिक शिक्षा देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. मानवाधिकार कार्यकर्त्या मसूदा कोहिस्तानी यांनी अमू न्यूजला सांगितले की, “तालिबान भीती निर्माण करण्यासाठी आणि क्रूरता दर्शविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारत आहे. हुमैरा इब्राहिम या आणखी एका कार्यकर्त्या म्हणाल्या की, “नागरिकांमध्ये भीती निर्माण करून आपले नियंत्रण मजबूत करण्यासाठी अशा प्रकारची शिक्षा दिली जात आहे. मात्र हे मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे.”