अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले सुरुच, बॉम्बस्फोटात डॉक्टरांसह 5 जण ठार

| Updated on: Dec 22, 2020 | 2:18 PM

काबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात चार डॉक्टरांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. (Afghanistan terrorist attack)

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले सुरुच, बॉम्बस्फोटात डॉक्टरांसह 5 जण ठार
Follow us on

काबूल: अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी यावेळी डॉक्टरांवर हल्ला केला आहे. काबूलमध्ये झालेल्या हल्ल्यात चार डॉक्टरांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. (Terrorist attack in Afghanistan blast in Kabul four doctors and one person died)

अफगाणिस्तानातील काबूल शहरातील पीडी 7 मधील दोघाबाद येथे सकाळी 7.33 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुल-ए-चकरी कारागृहात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या वाहनाला बॉम्बद्वारे उडवण्यात आले. घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. इस्तकबाल रुग्णालयाने या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.  (Terrorist attack in Afghanistan blast in Kabul four doctors and one person died)

हल्ल्यात 4 डॉक्टरांचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्यात एकूण चार डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या चार जणांमध्ये तीन महिला डॉक्टरांचा समावेश असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. काबूल पोलिसांचे प्रवक्ते फरदावस फारामर्ज यांनी वाहनाला बॉंम्ब लावून ते उडवण्यात आल्याची माहिती दिली. दहशतवाद्यांनी एक दिवसापूर्वी एका पत्रकाराची घरात घुसून हत्या केली होती.

दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेत वाढ

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 20 डिसेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अतिरेक्यांनी यावेळी खासदार हाजी खान मोहम्मद वरदक यांच्या कारवर निशाणा साधला. या हल्ल्यात खासदार वरदक गंभीर जखमी झाले होते. यामध्ये 15 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. काबूल शहरातील पीडी 5 क्षेत्रातील स्पिन ब्लॅक चौकात ही दुर्घटना घडली आहे.

संबंधित बातम्या:

काबूलमध्ये दहशतवादी हल्ला, तीन महिन्यात 37 आत्मघातकी हल्ले, अफगाणिस्तान का धुमसतंय?

नेपाळमध्ये राजकीय संकट वाढलं, पंतप्रधान ओलींकडून संसद बरखास्त, आता पुढे काय?

(Terrorist attack in Afghanistan blast in Kabul four doctors and one person died)