अबू धाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराने जिंकले 2025 चे MONDO-DR पारितोषिक

अबू धाबी बीएपीएस स्वामिनारायण मंदिराने ‘द फेरी टेल’ या इमर्सिव अनुभवासाठी प्रतिष्ठित MONDO-DR पारितोषिक जिंकले आहे. AV क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा हा सन्मान आध्यात्मिक नवकल्पना, जागतिक मान्यता आणि तंत्रज्ञान व परंपरेच्या अद्वितीय संयोगाचे प्रतीक आहे. हे मंदिर आता "सामंजस्याचे जागतिक केंद्र" बनले आहे.

अबू धाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराने जिंकले 2025 चे MONDO-DR पारितोषिक
| Updated on: Oct 11, 2025 | 12:51 PM

अबू धाबीतील बीएपीएस स्वामिनारायण मंदिराने ‘द फेरी टेल’ या क्रांतिकारी इमर्सिव अनुभवासाठी 2025 चे प्रतिष्ठित MONDO-DR पारितोषिक जिंकून इतिहास घडवला आहे. AV (ऑडिओ-व्हिज्युअल) क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखले जाणारे हे पारितोषिक केवळ सन्मान नव्हे तर ही आध्यात्मिक नवकल्पना, जागतिक मान्यता आणि तंत्रज्ञान व परंपरेच्या अद्वितीय संयोगाची उजळणी आहे.

आध्यात्मिक स्थळांचा जागतिक गौरव

MONDO-DR मासिकाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पारितोषिक AV उद्योगातील उत्कृष्टतेचे शिखर मानले जाते. मनोरंजन, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतील तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि भावनिक प्रभाव असलेल्या प्रकल्पांना हे पारितोषिक दिले जाते. 2025 मध्ये हाउस ऑफ वर्शिप श्रेणीत जागतिक स्तरावर अनेक प्रतिष्ठित कॅथेड्रल्स, मशीदी आणि सिनेगॉग्स यांचे जबरदस्त स्पर्धक प्रकल्प होते. मात्र त्यातही बीएपीएस हिंदू मंदिराने बाजी मारत, आध्यात्मिक स्थळांमध्ये इमर्सिव AV डिझाइनसाठी नवीन मापदंड निर्माण केला आणि ते पारितोषक जिंकले.

‘द फेरी टेल’: प्रेरणादायी तंत्रज्ञान

‘द फेरी टेल’ हा केवळ एक दृश्यप्रयोग नाही, तर एक भावनिक यात्रा आहे. यात अद्ययावत सराउंड साऊंड, 20 समक्रमित प्रोजेक्टर (synchronized projectors) आणि प्रभावी कथाकथन यांचा संगम आहे. बीएपीएसचे साधू, स्वयंसेवक आणि जगप्रसिद्ध AV सल्लागारांनी मिळून हा शो साकारला. प्रमुख स्वामी महाराजांचे शारजाहमधील प्रार्थनासत्र, शेख मोहम्मद बिन झायेद यांची उदारता, तसेच महंत स्वामी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला भव्य उद्घाटन समारंभ असे यात प्रमुख क्षण जिवंत होतात. “‘द फेरी टेल’ इमर्सिव शोला वेगळं ठरवतं ते म्हणजे त्याची कल्पकता, सर्जनशील संकल्पना आणि जागतिक संदेश असं VueAV चे टेक्निकल डायरेक्टर, ॲड्रियन गूल्डर म्हणाले. स्वामी ब्रह्मविहारिदास यांनी लिहिलेली व निवेदित केलेली स्क्रिप्ट अत्यंत प्रभावी आणि परिवर्तन घडवणारी आहे.” असंही त्यांनी नमूद केलं.

एकतेचा आणि प्रगतीचा विजय

MONDO-DR पारितोषिक जिंकल्याने बीएपीएस मंदिर केवळ एक आध्यात्मिक व स्थापत्यशास्त्रीय चमत्काच ठरत नाही, तर धार्मिक सहिष्णुता, सांस्कृतिक समावेश आणि तांत्रिक उत्कृष्टतेचे प्रतीक ठरते. अबू धाबी आता “सामंजस्याचे जागतिक केंद्र” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. हा इमर्सिव शो प्रत्येक हृदयाला एक वैश्विक आध्यात्मिकता अनुभवण्याची संधी देतो. “हे केवळ एक शो बसवण्याबाबत नव्हते. हे एक असं वातावरण तयार करण्याबद्दल होतं जिथे कोणत्याही पार्श्वभूमीतील माणूस एका खोल आध्यात्मिक पातळीवर स्वतःला जोडू शकेल.” असं स्वामी ब्रह्मविहारिदास म्हणाले.

उत्कृष्टतेची परंपरा

फेब्रुवारी 2024 मध्ये उघडल्यापासून, या मंदिराने अनेक पुरस्कार मिळवले आहेत – MEED प्रोजेक्ट अवॉर्ड (सर्वोत्तम सांस्कृतिक प्रकल्प, UAE व MENA), MEP अवॉर्ड, तसेच वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टिव्हलमधील गौरव. MONDO-DR पारितोषिक हे सिद्ध करतो की – आध्यात्मिक सौंदर्य आणि आधुनिक तांत्रिक कौशल्य यांचा संगम आजच्या युगात जग बदलू शकतो.