ट्रम्प यांची झोप उडवणारा हल्लेखोर कोण? फोटो आले समोर, जगाला थक्क करणारा होता खतरनाक प्लान

वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव नासिर बेस्ट असून तो येशू ख्रिस्ताचा अनुयायी होता असे म्हटले जाते. हल्लेखोर व्हाईट हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता, असे वृत्त आहे.

ट्रम्प यांची झोप उडवणारा हल्लेखोर कोण? फोटो आले समोर, जगाला थक्क करणारा होता खतरनाक प्लान
White House Attacker
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 24, 2026 | 8:35 AM

महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव सध्या टांगणीला लागलेला दिसत आहे. इराण आणि अमेरिका संघर्ष सुरू झाल्यापासून ट्रम्प यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आधी ट्रम्प एका हॉटेलमध्ये असताना गोळीबार झाला. त्यानंतर ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं. या घटनेला दोन दिवसही उलटत नाही तोच व्हाइट हाऊसबाहेर आज अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. तब्बल 20 राऊंड फायरिंग करण्यात आली. विशेष म्हणजे ट्रम्प व्हाइट हाऊस बाहेर असतानाच हा हल्ला झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा हल्लेखोर कोण हे समोर आलं आहे. त्याचा फोटोही समोर आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने व्हाईट हाऊसच्या अगदी जवळ पोहोचून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने तत्काळ प्रत्युत्तरादाखल कारवाई करत त्याला ठार केले.

नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर व्हाईट हाऊसचा ‘नॉर्थ लॉन’ परिसर रिकामा करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिसचे एजंट्स, स्नायपर्स आणि मोठा सुरक्षा फौजफाटा संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला. अहवालांनुसार, कोणत्याही मोठ्या धोक्याला तत्काळ रोखण्यासाठी व्हाईट हाऊसच्या छतावर काउंटर स्नायपर्स देखील सक्रिय करण्यात आले होते. सीक्रेट सर्व्हिसच्या निवेदनानुसार, १७ वी स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू जवळ एका व्यक्तीने आपल्या बॅगमधून शस्त्र काढले आणि गोळीबार सुरू केला. सीक्रेट सर्व्हिस पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि त्यात संशयिताला गोळी लागली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या गोळीबारात एका पादचाऱ्यालाही (वाटसरूला) गोळी लागली आहे.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, नसीरे बेस्ट नावाचा तरुण या संपूर्ण घटनेच्या केंद्रस्थानी आहे. जरी यंत्रणांनी अद्याप त्याच्या हेतूबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नसले तरी, सुरक्षा यंत्रणांनी त्याची पार्श्वभूमी आणि संपर्कांची चौकशी सुरू केली आहे. असे सांगण्यात येत आहे की, गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात खळबळ उडाली आणि काही काळासाठी आजूबाजूची वाहतूक व ये-जा थांबवण्यात आली. याच परिसराजवळ व्हाईट हाऊस असल्याने सुरक्षा यंत्रणांनी कोणताही धोका पत्करण्यास नकार दिला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पथकांकडून माहिती गोळा केली जात असून तपास सुरू असल्याचे सीक्रेट सर्व्हिसने स्पष्ट केले आहे.

हल्लेखोराची ओळख

एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी सांगितले की, २१ वर्षीय नासिर बेस्टने गोळीबार केला आणि सुरक्षा दलांनी त्याला ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार, नासिरने आपल्या बॅगेतून रिव्हॉल्वरने गोळीबार केला, परंतु प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. एका वाटसरूलाही गोळी लागली. दोन्ही हल्लेखोर व्हाईट हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत आधीच सतर्कता वाढवण्यात आली आहे. अलीकडेच व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरशी संबंधित हत्येच्या कथित कटाचे प्रकरणही समोर आले होते. याच महिन्यात अमेरिकेच्या अॅटर्नी जीनिन पिरो यांनी त्या कथित हल्ल्याशी संबंधित एक व्हिडीओ देखील जारी केला होता, ज्यामध्ये एका आरोपीने सीक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला होता.

Follow Us