तब्बल चार महिन्यानंतर सकाळ झाली! अंटार्क्टिकामध्ये हिवाळा संपला आणि सूर्योदय झाला

अंटार्क्टिकामध्ये चार महिन्यांनंतर हिवाळा संपला आणि हवामानात बदल घडला. अखेरीस येथे दिवस उजाडला आहे. येथील रिसर्च स्टेशनवर कार्यरत असेलल्या टीमने सोनेरी सूर्य किरणांचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.  कॉनकोर्डिया रिसर्च स्टेशनवर बारा सदस्यांच्या क्रू कार्यरत आहे.

तब्बल चार महिन्यानंतर सकाळ झाली! अंटार्क्टिकामध्ये हिवाळा संपला आणि सूर्योदय झाला
| Updated on: Aug 25, 2022 | 6:03 PM

लंडन : पृथ्वीवरील अतिशय थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंटार्क्टिकामध्ये(Antarctica ) चार महिन्यानंतर पहाट झाली आहे. चार महिन्यांची प्रदिर्घ रात्र संपून अंटार्क्टिकामध्ये सूर्योदय( Sun rises ) झाला आहे. अंटार्क्टिकामध्ये चार महिन्यांनंतर हिवाळा संपला आणि हवामानात बदल घडला. अखेरीस येथे दिवस उजाडला आहे. येथील रिसर्च स्टेशनवर कार्यरत असेलल्या टीमने सोनेरी सूर्य किरणांचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.  कॉनकोर्डिया रिसर्च स्टेशनवर बारा सदस्यांच्या क्रू कार्यरत आहे. ऑगस्ट महिना त्यांच्यासाठी नवी पहाट घेऊन आला आहे. याठिकाणी तब्बल चार महिन्यानंतर पहाट फुलली असून अखेर सूर्य उजाडला झाला आहे.

अंटार्क्टिकामध्ये चार महिन्यांनंतर ऋतू बदल झाला

अंटार्क्टिकामध्ये चार महिन्यांनंतर ऋतू बदल झाला आहे. येथे हिवाळ्याचे दिवस संपले आहेत. हवामानात बदल घडला आहे. सूर्योदय होणे हे वैज्ञानिकांसाठीही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बाब आहे. याचवर्षी मेमध्ये दक्षिण गोलार्धातील या ध्रुवावर सूर्यास्त झाला होता आणि चार महिन्यांची दीर्घ रात्र सुरू झाली होती.

वैज्ञानिकांनी सनराईजचे फोटोही शेअर केले

येथील रिसर्च स्टेशनवरील संशोधक ही प्रदिर्घ रात्र संपून पुन्हा एकदा सूर्योदय होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या महिन्यात दक्षिण ध्रुवावर रात्रीच्या गर्भातून सूर्य किरण डोकावले.

युरोपियन स्पेस एजन्सीने एका ब्लॉगमधून याबाबतची माहिती दिली. वैज्ञानिकांनी सनराईजचे फोटोही शेअर केले आहेत. तेथे राहणार्‍या वैज्ञानिकांनी आपले संशोधन तीन चतुर्थांशाने पूर्ण केले होते व आता ते पूर्णपणे पार पडेल असा विश्वास वैज्ञानिकां व्यक्त केला आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या डॉ. हॅन्स हॅगसन यांनी रिसर्च स्टेशनच्या मेन डोअरमधून या पहाटेचा सुंदर फोटो टिपला व तो शेअर केला. सूर्यकिरणांनी आमच्या चेहऱ्यावर स्मित आणले आहे आणि आता या साहसी कार्याचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अंटार्क्टिकामध्ये हिवाळा अतिशय कडक असतो. येथील तापमान उणे 80 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होते. हिवाळ्यात चार महिने तिथे निबीड अंधःकारच असतो.