AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Secret Chamber : रशिया-युक्रेन युद्धात ती मोठी अपडेट, सापडले ते सीक्रेट…त्या तळघरात दडलंय तरी काय…शास्त्रज्ञ पण हैराण

Secret Chamber Ukraine : रशिया आणि युक्रेनमध्ये एकीकडे शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. पण दुसरीकडे दोन्ही देश एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर येत आहे, त्या तळघरात आहे तरी काय?

Secret Chamber : रशिया-युक्रेन युद्धात ती मोठी अपडेट, सापडले ते सीक्रेट...त्या तळघरात दडलंय तरी काय...शास्त्रज्ञ पण हैराण
| Updated on: Aug 21, 2025 | 4:13 PM
Share

पश्चिमी युक्रेनच्या हालिच शहरात एक रहस्यमयी तळघर सापडले आहे. गॅलेशियन किल्ल्याच्या खाली शतकानुशतके दडलेली एक अत्यंत दुर्मिळ वस्तू सापडली आहे. 2023 मध्ये युक्रेनच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या शास्त्रज्ञांना याविषयीचा अंदाज आला होता. एका जुन्या टॉवर खालील वायुवीजनसाठी तजवीज केली होती. त्याची तपासणी करत असताना हे तळघर सापडले. 300 वर्षांपासून ते बंद असल्याचे समोर आले आहे. 1676 मध्ये तुर्की आणि पोलिश यांच्यात जे युद्ध झाले. त्यानंतर हे तळघर बंद करण्यात आले होते. या छोटेखानी तळघराचा शोध महत्त्वाचा मानण्यात येत आहे.

कसा लागला शोध?

जुन्या गॅलिच राष्ट्रीय अभ्यारणचे संचालक व्लादिमीर ओलेनिक यांनी सांगितले की, जवळपास 150 क्युबीक मीटर दगड माती बाजूला करण्यात आले. हे काम करण्यासाठी अवजारांचा वापर करण्यात आला नाही हे विशेष. हे काम हातानेच करण्यात आले. कारण या मलब्या खाली काही तरी आहे, याचा अंदाज पुरातत्वशास्त्रज्ञांना आला होता. त्यामुळे मशीन, उपकरणांचा वापर करण्यात आला नाही. 17 व्या शतकात हे तळघर कोणत्या तरी भिंतीशी जोडलेले होते, ते समोर आले.

कशासाठी होता त्याचा उपयोग?

सुरुवातीच्या तपासात हे समोर आले आहे की, हे तळघर शस्त्र आणि दारुगोळा लपवण्यासाठी वापरात होता. इथे शत्रूंपासून दारुगोळा लपवण्यात येत होता. येथून तोफ सुद्धा डागण्यात आल्याचा अंदाज शास्त्रज्ञांना आला. त्यांनी तपास तसाच पुढे नेला.

आणि तो गुप्त रस्ता मिळाला

इतक्या खालच्या खंदकात तोफ कशासाठी वापरली असेल असा सवाल पुरातत्त्वशास्त्रज्ञांना पडला होता. त्यानंतर त्यांना भिंतीतून एक मोठे रहस्य कळाले. ती जागा भिंत बांधून बंद केल्याचे समोर आले. त्या ठिकाणी असलेल्या छिद्रातून पाहिले असता एक गुप्त रस्ता थेट किल्ल्याच्या दिशेने जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे या तळघरापर्यंत राजाला येण्यासाठीचा तो रस्ता असावा अशी चर्चा होत आहे. या किल्ल्याच्या अंतर्गत गुप्त रस्त्यांचे जाळे असल्याची किवंदती आता खरी ठरत आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.