AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : ‘तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!’ डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट

Donald Trump on Heaven : डोनाल्ड ट्रम्प हे लहरी असल्याचा फटका जगाला बसला आहे. त्यातच त्यांना नोबेल शांतता पुरस्कार हवा आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार आहे. टॅरिफ वॉर, नोबेल याभोवतीच त्यांचं राजकारण केंद्रीत झालं आहे. आता त्यांना स्वर्गारोहणाची स्वप्नं पडू लागली आहेत.

Donald Trump : 'तर माझी स्वर्गातील जागा फिक्स!' डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले ते ओपन सीक्रेट
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Aug 21, 2025 | 3:29 PM
Share

तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला वेठीस धरण्याचा जोरकस प्रयत्न सुरू केला आहे. जगात शांतता आणण्याचे नाटक करत जगावर अमेरिकेची दादागिरी त्यांना थोपवायची आहे. त्यातच आता ट्रम्प यांना स्वर्गारोहणाची स्वप्नं पडू लागली आहे. पण त्यासाठी अर्थातच त्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते पुण्य पदरात पडलं की, देव आपल्यासाठी स्वर्गाची दारं सताड उघडी करून ठेवेल असं त्यांना वाटतंय. अर्थात त्यांना कोणतं पुण्य पदरात पाडून घ्यायचं आहे हे तर उघडच आहे.

तर स्वर्गात जाण्याची दाट शक्यता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाविषयी हे आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी गंमतीत एक वक्तव्य केलं आणि ते चांगलंच व्हायरल झालं. ते म्हणाले की, रशिया आणि युक्रेन यांच्यात जर शांतता करार झाला तर त्यांची स्वर्गात जाण्याची शक्यता बळावेल. मंगळवारी एका अमेरिकन वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, मी प्रयत्न करतोय की, मी स्वर्गात जावं. मी असं ऐकलं की, माझी तब्येत चांगली नाही. मी तर सर्वात खाली आहे. पण जर हे काम करू शकलो(रशिया-युक्रेन शांतता करार) तर कदाचित मला स्वर्गात जाण्याचा मार्ग मिळेल.

नोबेल शांतता पुरस्कारासाठी आटापिटा

आपण जगातील 6 युद्धे थांबवली. या देशांमध्ये शांतता आणली. आपण आता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवू इच्छित आहोत. त्यांच्यात शांतता करार व्हावा अशी आपली इच्छा आहे, असे ट्रम्प म्हणाले.जर युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध थांबले तर ते जगासाठीच नाही तर आपल्या व्यक्तिगत जीवनातील एक ऐतिहासिक पाऊल ठरेल असे ट्रम्प यांना वाटते. इतकेच नाही तर नोबेल शांतता पुरस्कार मिळावा यासाठी त्यांनी मोठी फिल्डिंग लावल्याचे मानल्या जात आहे. भारताने त्यांना युद्ध थांबवल्याचे क्रेडिट न दिल्यानेच ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांकडे नोबेल पुरस्कार मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी नॉर्वेने पाठिंबा देण्याची सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखवली. तर स्वीडन या नोबेल पुरस्कार देणाऱ्या देशावर काय दबाव टाकला हे काही समोर आले नाही.

ट्रम्प यांचं वादळी आयुष्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयुष्य वादळी ठरले आहे. त्यांनी तीनदा लग्न केले आहे. त्यांना दोनदा महाभियोगाचा सामना करावा लागला आहे. तर एका गुन्ह्यात त्यांना दोषी पण ठरवण्यात आले होते. ट्रम्प यांच्या हडेलहप्पी धोरणामुळे अमेरिकेतच नाही तर जगभरात ते ट्रोल होत आहेत. त्यांच्याविरोधात संताप आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.